सिनेमा

अजय देवगणच्या 'दृश्यम 2' ची शूटिंग 'या ठिकाणी' झाली पूर्ण

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'दृश्यम 2' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्याचवेळी या चित्रपटाबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे शूटिंग गोव्यात एका शेवटच्या गाण्याने संपले आहे. जे साळगावकर कुटुंबावर चित्रित करण्यात आले आहे.

Payal Hargode

'दृश्यम 2' चित्रपटाची कथा 2 आणि 3 ऑक्टोबरच्या रहस्यावर आधारित आहे. ज्यामध्ये अजय देवगण व्यतिरिक्त अभिनेत्री तब्बू, अक्षय खन्ना, श्रिया सरन आणि इशिता दत्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिषेक पाठक दिग्दर्शित, दृश्यम 2, व्हायाकॉम18 स्टुडिओज प्रस्तुत आहे. गुलशन कुमार, टी-सीरीज आणि पॅनोरमा स्टुडिओच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे तर भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

देवी श्री प्रसाद यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाशिवाय अजय देवगणच्या आगामी चित्रपटांमध्ये 'थँक गॉड', 'लव रंजन नेक्स्ट', 'मैदान', 'भोला' आणि 'गोलमाल 5' यांचा समावेश आहे.

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले