बॉलीवूड

Ranveer Singh प्रकरणावर FWICE चे सल्लागार! सांगितलं "ही ती बंदी नव्हे"; रणवीरला 'या' गोष्टींना जावे लागणार सामोरे

सिनेप्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी अशोक पंडित यांनी पुढाकार घेतला आहे. रणवीर सिंगने ‘Don 3’ चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने वादाला सुरुवात झाली आहे.

दिवेश चव्हाण
  • सदर प्रकरणाविषयी सिनेप्रेक्षकांच्या मनात अनेक संभ्रम!
  • दूर करण्यासाठी अशोक पंडित यांनी पुढाकार घेतला!
  • Ranveer Singh ने अचानक Don 3 सिनेमातून माघार घेतली

अभिनेता Ranveer Singh वादाच्या घोळक्यात सापडला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने अभिनेत्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून Dhurandhar सिनेमाच्या सिक्वेलला मिळालेल्या यशामुळे चर्चेत असलेल्या Ranveer ची चर्चा तर कायम आहे, परंतु चर्चेला फार मोठे वळण आले आहे. FWICE ने जारी केले आहे की त्यांच्या संस्थेतील संलग्न कोणतेही घटक यापुढे Ranveer Singh ला सहकार्य करणार नाहीत. एकंदरीत, अभिनेता रणवीर सिंहला FWICE द्वारे Ban करण्यात आले आहे. परंतु, Ban FWICE ने केले आहे, Bollywood ने नाही. त्यामुळे सदर प्रकरणाविषयी सिनेप्रेक्षकांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत, ते दूर करण्यासाठी स्वतः FWICE संस्थेचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी पुढाकार घेतला आहे.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेता फरहान अख्तर तसेच रितेश सिधवानीने अभिनेता रणवीर सिंहवर आरोप केले आहेत. तसेच FWICE कडे तक्रार नोंदवली आहे. त्यांचे म्हणणे आहे की Promo शूट झाला. सिनेमाचे Pre Production ही शूट झाले आणि अभिनेता Ranveer Singh ने अचानक Don 3 सिनेमातून माघार घेतली आहे आणि त्यामुळे निर्मात्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच निर्मात्यांकडून 45 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणीही करण्यात आली आहे.

काय म्हणाले FWICE?

FWICE या संस्थेचे म्हणणे आहे की "आम्ही अभिनेता रणवीरला फक्त एकदा नाही तर तीनदा बोलवले, जेणेकरून त्याचीही बाजू आम्हाला ऐकता येईल. परंतु, तो हजर राहिला नाही." त्यावर Ranveer च्या कायदेशीर टीमने प्रत्युत्तर दिले की "FWICE हे कोर्ट नाही!"

"बंदी घालायला आम्ही कोर्ट..."

या संपूर्ण प्रकरणावर व्यक्त होताना FWICE संस्थेचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी सांगितलं की, "रणवीर सिंगवर आम्ही कोणतीही बंदी घातलेली नाही. ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने समोर आली आहे. आम्ही कोर्ट नसल्यामुळे बंदी घालण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही फक्त ‘नॉन-कोऑपरेशन’ म्हणजे असहकार्याची नोटीस जारी केली आहे. यानुसार, प्रकरण सुटत नाही तोपर्यंत संस्थेशी संबंधित ३० क्राफ्ट सदस्यांना रणवीर सिंगसोबत काम न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे प्रकरण मिटवण्यासाठी रणवीर सिंगशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही."

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या