"मी नाटकी, पण..." ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर असं का म्हणाले ? 
सिनेमा

KBC 16मध्ये नाना पाटेकर यांनी अमिताभ बच्चनसोबतच्या हृदयस्पर्शी आठवणी केल्या शेअर

'कौन बनेगा करोडपती १६' मध्ये विशेष भागात ‘वनवास’चित्रपटाचे कलाकार आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहणार आहेत. नाम फाऊंडेशनसाठी खेळत असताना नाना पाटेकर यांनी त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर भाष्य केले.

चेतन बोडके

येत्या शुक्रवारी, 'कौन बनेगा करोडपती १६' मध्ये एका विशेष भागात ‘वनवास’चित्रपटाचे कलाकार नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहणार आहेत. नाना पाटेकर होस्ट अमिताभ बच्चन समोर हॉटसीटवर बसणार आहेत. तो या भागाचा हायलाइट असेल. काही वेधक किस्से आणि आठवणी सांगून हा एपिसोड नक्कीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. नाम फाऊंडेशनसाठी खेळत असताना नाना पाटेकर त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल नाना यांनी पहिल्यांदाच भाष्य केलेय.

शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता आणून त्यासाठी निधी उभारण्याचा नाना पाटेकरचा उद्देश आहे. एका हृदयस्पर्शी क्षणी, नाना पाटेकर यांनी ‘नाना’शब्दाशी निगडीत किस्सा सांगितला. ते म्हणाले, “आम्ही ‘कोहराम’चित्रपटाचे शूटिंग करत होतो. एक दिवस अमित यांनी सेटवर सर्वांनाच मिठाई वाटली. मी त्यांना विचारलं की काय स्पेशल आहे? त्यावर ते म्हणाले, “मी आजोबा झालो, माझ्या मुलीला बाळ झाले, मी नाना झालो!”त्यावर आपल्या विनोदबुद्धीने ओळखल्या जाणाऱ्या नानांनी टिप्पणी केली की, “किती तरी वर्षं झाली, मी तर जन्मापासूनच नाना आहे.”

संभाषणाच्या ओघात नाना पाटेकरांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक गोड आणि व्यक्तीगत आठवण शेअर केली. ते म्हणाले, “एक दिवस अमितजी एक मस्त शर्ट घालून आले होते. मी त्यांना तसे सांगितले तेव्हा ते म्हणाले की तो अभिषेकचा शर्ट आहे. संध्याकाळी अमितजी निघून गेल्यानंतर मला निघायला जरा उशीर झाला होता. माझ्या शूटनंतर जेव्हा मी माझ्या व्हॅनिटीमध्ये गेलो, तेव्हा तो शर्ट तिकडे हँगरवर लावून ठेवला होता. आजही तो शर्ट माझ्याकडे आहे.” नाना आणि अमिताभ बच्चन यांच्या सहवासात संस्मरणीय रजनी अनुभवा आणि त्यांच्या दैदीप्यमान करकिर्दीतील काही खास किस्से आपल्याला येत्या शुक्रवारी, कौन बनेगा करोडपती १६ मध्ये पाहायला मिळतील.

पुण्यात भरदिवसा गोळीबार; शिवाजीनगर कोर्टाबाहेर घडला थरार, एक जखमी

Astro Tips: गोड खाल्ल्यानंतर लगेच घराबाहेर का पडू नये? जाणून घ्या धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारण

Student Death: OYO हॉटेलच्या खोलीत विद्यापीठाच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृतदेह! नाका-तोंडातून येत होता फेस अन्...

India Launches Blenrep : रक्त कर्करोग उपचारात मोठी प्रगती! GSK कडून 'Blenrep' लाँच; मल्टिपल मायलोमा रुग्णांना मिळणार नवा पर्याय

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर! १२,१०८ सूक्ष्म व लघु उद्योगांतून केवळ ७१ हजार जणांना रोजगार