विनेश फोगाट दिल्ली विमानतळावर पोहोचताच करण्यात आले जंगी स्वागत - फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारे शुटर गगन नारंग यांनी दिल्ली विमानतळावर कुस्तीपटू विनेश फोगाटची भेट घेऊन फोटो शेअर केला आहे. फोटो सौजन्य - गगन नारंग X अकाउंट भारताचा स्टार बॉक्सर आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंह याने सोशल मीडियावर विनेशला मोठ्या प्रमाणात साथ दिली, त्याचबरोबर तो तिच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर सुद्धा दिसला. फोटो सौजन्य - विजेंदर सिंह X अकाउंट साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे तिचे जवळचे मित्र आहेत त्यांनी तिच्या समर्थानात तिला साथ दिली आहे, या दोघांना पाहून ती भावुक होताना दिसली. फोटो सौजन्य - सोशल मीडिया विनेश फोगाटच्या स्वागतासाठी तिची आई देखील विमानतळावर आली होती यावेळी तिच्या आईच्या चेहऱ्यावर मोठे हास्य पाहायला मिळाले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया विनेश फोगाटच्या स्वागतासाठी साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या दोघांनी मोठ्या रॅलीचे आयोजन केले आहे, यासाठी दिल्लीमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. फोटो सौजन्य - सोशल मीडिया