15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील काही पालिकांकडून मटण विक्री आणि मांसाहार बंदी घालण्यात आली आहे (फोटो - iStock)  
फोटो

Meat Banned : स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात 'या' भागात मटण खाण्याची चोरी! तुमच्या शहराचं नाव तर नाही?

यंदा देशामध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशामध्ये आनंदाचे वातावरण असले तरी देखील महाराष्ट्रामध्ये नवा वाद उफाळून आला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये स्वातंत्र्यदिनी मांसाहारावर बंदी घालण्यात आली आहे. यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली असून ही काहींनी समर्थन देखील केले आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया / iStock)

प्रीति माने
14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत कोणताही प्राणी कत्तल करू नये किंवा मांस विक्री करू नये, असे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार कलम ३३४, ३३६ आणि ३७४ (अ) अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्री करणाऱ्या दुकानांवर बंदी असल्याचे जाहीर केले. याविषयी सर्वप्रथम KDMC ने आदेश जारी करत 15 ऑगस्टच्या दिवशी मांस-मटण विक्रीवर बंदी असल्याचे जाहीर केले होते. इथून वादाची सुरुवात झाली.
याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपूरमध्ये देखील हा फतवा काढण्यात आला आहे. नागपूर महापालिकेने 15 ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीला चिकन मटण दुकान आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहेत.
स्वातंत्र्यदिनी मांसाहार करण्यावर मालेगाव पालिकेने देखील बंदी घातली आहे. इतर पालिकांप्रमाणे मालेगावमध्ये देखील ही बंदी लागू करण्यात आली आहे.
मांसविक्री करण्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले आहेत.
अमरावती येथील पालिकांनीही 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचं कारण देत मांस विक्रीवर बंदी घालत तसे निर्देश दिले आहेत. यामुळे अनेकांचा हिरमोड देखील झाला आहे.
स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात मांसाहार विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिकेचे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी काढले आहेत.

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक