पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोलीस व प्रशासनाची आढावा बैठक घेतली (फोटो - सोशल मीडिया)  
राजकारण

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये! आढावा बैठक घेत दिले 'हे' निर्देश, म्हणाल्या, "हे खपवून..."

Pune News : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात झालेल्या खुनी हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोलिस प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. कोयता गँग, ड्रग्ज माफिया आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

प्रीति माने
  • शिवाजीनगर हल्ला प्रकरणानंतर सुनेत्रा पवार यांची आढावा बैठक

  • शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा

  • पोलीस व प्रशासनाला दिले आदेश

पुणे : आकाश ढुमे पाटील : शिवाजीनगर न्यायालय परिसरात झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेनंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यात पोलिसांनी अधिक प्रभावी भूमिका बजावावी, कोयता गँग आणि ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करावी, तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पोलिस प्रशासनाला दिले. पुणे शहरासह जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

शिवाजीनगर न्यायालय परिसरातील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामकाजाचा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. २७) शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत पोलिसांच्या कार्यपद्धती, गुन्हेगारी नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपकुमार गिल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

घटना घडल्यानंतर नव्हे, आधीच गुन्हेगारीवर नियंत्रण

शिवाजीनगर न्यायालय परिसरातील खुनी हल्ल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी पोलिसांच्या प्रतिबंधात्मक यंत्रणेवर भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली. गुन्हा घडल्यानंतर तपास आणि कारवाई करण्याबरोबरच संभाव्य गुन्हेगारी घटनांना आधीच रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

शरद पवार गटाकडून तीन ओळींचा व्हीप जारी; संसदीय खासदारांना दिला 'हा' आदेश

गुन्हेगारी हालचालींची गोपनीय माहिती संकलित करणारी यंत्रणा सक्षम आणि सक्रिय करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर, कोयता गँगवर आणि ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण करावा. गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना वेळीच रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देशही देण्यात आले.

सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा वाढविण्याचे निर्देश

पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणे, संवेदनशील परिसर आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढविण्याची सूचना करण्यात आली. नियमित तपासणी, प्रभावी सुरक्षा व्यवस्था आणि संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

Political News : 'सुप्रिया सुळेंसुद्धा १५० कोटी मिळालेत का?' संजय शिरसाट यांचा संजय राऊतांना टोला

वाहतूक व्यवस्थेतील शिस्त आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. पोलीस विभागाने कामकाजात अधिक तत्परता, कार्यक्षमता आणि परिणामकारकता आणण्याची गरज असल्याचे पवार यांनी नमूद केले.

संपूर्ण दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे अयोग्य

शिवाजीनगर न्यायालय परिसरातील घटनेवरून संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नसल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. घटना दुर्दैवी असली, तरी पोलीस दल आपल्या कामगिरीत सुधारणा करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात पोलिसांचा धाक आणि दबदबा नागरिकांना निश्चितपणे दिसून येईल, असेही त्या म्हणाल्या.

पुणे हे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शहराची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक ओळख कायम राखण्यासाठी शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पोलिसांनी अधिक सतर्क, सक्षम आणि परिणामकारकपणे काम करावे, तर नागरिकांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

शिवाजीनगर न्यायालयातील हल्ल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पोलिसांना कोणते निर्देश दिले?

शिवाजीनगर न्यायालय परिसरातील खुनी हल्ल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांचा आढावा घेतला. कोयता गँग, ड्रग्ज माफिया आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या?

गुन्हेगारी हालचालींची गोपनीय माहिती संकलित करणे, संवेदनशील भागांत पोलीस गस्त वाढवणे, नियमित तपासणी करणे आणि संभाव्य गुन्हेगारी घटना आधीच रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सुनेत्रा पवार यांनी पुणे पोलिसांच्या कामगिरीबाबत काय म्हटले?

एका दुर्दैवी घटनेवरून संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. पोलीस दल आपल्या कामकाजात सुधारणा करेल आणि आगामी काळात पोलिसांचा धाक नागरिकांना दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे कोर्ट हल्ल्यामागील धक्कादायक ट्विस्ट! पहिलं टार्गेट होतं..., पण किवळे बाहेर येताच बदलला प्लॅन.

Climate Change : मुसळधार पाऊस पडूनही नद्या आणि तलाव का पडत आहेत कोरडे ? जगभरातील नद्यांचा प्रवाह 5.7 टक्क्यांनी घटला

IND vs NZ: एका खेळीत विक्रमांची रांगच पार! केन विल्यमसनला पछाडलं, कोहलीलाही टाकलं मागे; Tom Lathamची WTC मध्ये ऐतिहासिक कामगिरी

Delimitation and Women Reservation Bill: मोदी सरकारचा मोठा डाव यशस्वी; ठाकरे-पवारांनंतर काँग्रेसचे खासदारही भाजपच्या गळाला?

मला व्यसनमुक्ती केंद्रात का पाठवले? म्हणत पतीचा संताप; पत्नीवर स्वयंपाकघरातील चाकूने वार