World

चिलीत कपड्यांचा डोंगर : वर्षाला ३९ हजार टन कपड्याच्या कचऱ्याचा ढीग, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कपडे शोधतायेत लोक

येथे फेकल्या जाणाऱ्या कपड्यांच्या डोंगरात (Cloths Mountain) दरवर्षी किमान ३९ हजार टनांची वाढ होत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या फॅशन इंडस्ट्रीमुळे (Fashion Industry) प्रदूषणातही वाढ (Increase Pollution) होत आहे. कपड्यांचे ढीग उघड्यावर सोडून जमिनीत गाडले गेल्याने ते पर्यावरणाची हानी (Damage to the Environment) करतात.

Navarashtra News Network

चिली (Chile) हा दक्षिण अमेरिकन देश (South American Country) त्याच्या सुंदर पर्वतांसाठी जगभरात ओळखला जातो. या देशात २२ पर्वत आहेत ज्यांची उंची २० हजार फुटांपेक्षा जास्त आहे, परंतु चिलीच्या अटाकामा वाळवंटात (Atacama Desert) असाच एक पर्वत (Mountain) आहे जो कपडे आणि बूटांनी बनलेला आहे. या डोंगरावर ख्रिसमसच्या स्वेटरपासून ते स्की बूट्सपर्यंतचा कचरा आहे.

येथे फेकल्या जाणाऱ्या कपड्यांच्या डोंगरात (Cloths Mountain) दरवर्षी किमान ३९ हजार टनांची वाढ होत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या फॅशन इंडस्ट्रीमुळे (Fashion Industry) प्रदूषणातही वाढ (Increase Pollution) होत आहे. कपड्यांचे ढीग उघड्यावर सोडून जमिनीत गाडले गेल्याने ते पर्यावरणाची हानी (Damage to the Environment) करतात. त्यातील रसायने हवा आणि भूगर्भातील पाण्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना घाण करतात.

दरवर्षी ५९ हजार टन कपडे बंदरात येतात

चिली हे पूर्वीपासून विंटेज आणि न विकल्या गेलेल्या कपड्यांचे केंद्र आहे. हे कपडे चीन किंवा बांगलादेशात बनवले जातात. दरवर्षी सुमारे ५९,००० टन कापड उत्तर चिलीच्या अल्टो हॉस्पिसिओ प्रदेशातील इक्विक पोर्टवर पाठवले जाते, जेथे ते कपड्यांचे व्यापारी विकत घेतात. येथून सीमेपलीकडे इतर लॅटिन अमेरिकन देशांमध्येही कपड्यांची तस्करी होते.

काही लोक स्वत:साठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी वापरल्या जाणार्‍या कपड्यांची वर्गवारी करायला येतात. तथापि लोक ते विकण्यासाठी देखील गोळा करतात. २०१९ च्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, २००० ते २०१४ दरम्यान जगभरात कपड्यांचे उत्पादन दुप्पट झाले. जागतिक स्तरावर होणाऱ्या एकूण पाण्याच्या अपव्ययापैकी २०% कापड उद्योग जबाबदार आहे.

कृत्रिम रसायनांनी उपचार केलेले कापड बायोडिग्रेड होण्यासाठी २०० वर्षे लागू शकतात आणि ते टायर किंवा प्लास्टिकसारखेच विषारी असतात. कापड उद्योगात लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कमी पगारावर काम करावे लागते. तीन लाख लोकसंख्या असलेल्या या भागात गरीब लोक कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जाऊन गरजेच्या वस्तू शोधतात. एक स्त्री ढिगाऱ्यात वापरलेले कपडे शोधत आहे. चिलीमध्ये दरवर्षी इतके फॅब्रिक येते की व्यापारी ते विकण्याची अपेक्षा करू शकत नाहीत. ते इतरत्र नेण्यासाठी कोणीही भाडे द्यायला तयार नाही.

इकोफिब्रा आणि इकोसाइटेक्स अशा कंपन्या आहेत ज्या या कापडांचा पुनर्वापर करतात. इकोफिब्राचे संस्थापक, फ्रँकलिन झेपेडा म्हणतात की समस्या ही आहे की फॅब्रिक बायोडिग्रेडेबल नाही आणि त्यात रसायने आहेत, त्यामुळे ते महानगरपालिकेच्या लँडफिलमध्ये स्वीकारले जात नाही.

Ecocytex Co. चे सॅंटियागो येथील स्टोअर, जेथे वापरलेले कपडे विकले जातात. , २०१९ मध्ये Ecositex लाँच करण्यापूर्वी हे Rosario Hevea ने उघडले होते. लहान मुलांचे कपडे इथे रिसायकल केले जात होते. ही कंपनी टाकून दिलेल्या कपड्यांच्या तुकड्यांपासून सूत तयार करते.

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले