नवी दिल्ली : पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या पाच राज्याच्या निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाल्यापासून देशाच्या राजकीय स्तरातून प्रतिक्रीया यायला यायला लागल्या आहेत. पंजाबमध्ये भाजप आणि कॅाग्रेसला हरवून आम आदमी पक्षाने विजयाचा झेंडा रोवला आहे. यावर आपचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रीया देताना पंजाबच्या जनतेने आभार मानले आहे.
विजयानंतर बोलताना केजरीवाल यांनी त्यांच्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पंजाबच्या मतदारांनी कमाल करुन दाखवली असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीत सुरु असलेली विकासाची आणि सर्वसामान्यांसाठीची कामे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या प्रेरणेने सुरु आहेत असेही त्यांनी सांगितले.
पंजाब निवडणुकीच्या काळात केजरीवाल हे दहशतवाद्यांचे समर्थक असल्याचा आरोप करण्यात आला होता. आपण दहशतवादी नाही, हे जनतेने दाखवून दिले आहे. मात्र जे आपल्यावर मिळून टीका करीत होते, ते सगळे मिळून देशाला लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोबही त्यांनी केला. आता दिल्ली, पंजाब जिंकले आता यापुढे जात देशावर सत्ता मिळवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ज्या ज्या राजकीय पक्षांनी देएशाला लुटले, त्यांच्याविरोधात सामान्य नागरिकच उभा राहू शकतो. भलेही त्याला संकटाचा सामना करावा लागला तरी चालेल हेही त्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थी, इंजिनिअरिंग विद्यार्थी, उद्योगोपती, व्यापारी यांनी आपमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. भगवंत मान हे आता नव्याने पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, त्यांनाही केजरीवाल यांनी शुभेच्छा दिल्यात.
[read_also content=”हा त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनाचा विजय, संजय राऊत यांची भाजपच्या बंपर विजयावर प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/this-is-the-victory-of-his-election-management-says-sanjay-raut-on-bjps-bumper-victory-252640.html”]