पणजी : देशातील सर्वात लहान राज्य असेलल्या गोव्यात (Goa) भाजपाचे सरकार स्थापन होणार हे आता जवळपास निश्चित झालेले आहे. भाजपाच्या खात्यात २० जागा आल्या आहेत. त्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Goa Assembly Election Results 2022) काही अपक्ष आणि महाराष्ट्र गोमंतवादी पार्टीही (MGP) भाजपासोबत सत्तेत जाण्याच्या तयारीत आहे. गोव्यात बहुमताचा आकडा २१ आहे. त्यामुळे भाजपा गेल्यावेळी पेक्षाही सुस्थितीत आहे. काही जागांवर मात्र विजयाचे अंतर हे ५०० मतांचेही नाहीये. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही अवघ्या ५०० मतांच्या आसपास निवडून आले हेत. याचाच अर्थ असा की भाजपाविरोधी मते अनेक ठिकाणी विभागल्यामुळे भाजपाला त्याचा थेट फायदा झालेला दिसतो आहे.
गोव्यात भाजपाने सत्तेची हॅट्रिक केली हे. २०१२, २०१७ साली भाजपाने मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले होते. आता पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांच्याविना भाजपा गोव्यात सरकार स्थापन करणार आहे. एकेकाळी पर्रिकरांशिवाय भाजपाचे गोव्यात अस्तिव नाही हे सांगण्यात येत होते, त्यावरुन आता पर्रिकर पुत्राशिवायही सत्तास्थापनेचा मार्ग भाजपाला सापडलेला आहे.
ममता-केजरीवाल यांच्यामुळे भाजपाला लाभ
ममताने एमजीपीसह निवडणुका लढवल्या. तर केजरीवाल यांनी ४० पैकी ३९ जागी उमेदवार दिले होते. या दोन्ही पक्षांनी काँग्रेसची मते खाल्ली. त्याचा फायदा भाजपाला झाला. भाजपाविरोधी असलेली मते विरोधकांत वाटली गेली. ही मते एकवटली असती तर त्याचा तोटा भाजपाला झाला असता. पण तसे झाले नाही.
काँग्रेस आयारामांमुळे पक्षाची ताकद वाढली
२०१७ साली १७ निवडून आलेल्या काँग्रेस आमदारांपैकी १५ आमदार नंतरच्या काळात भाजपात आले. निवडमुकीपूर्वी काँग्रेसकडे केवळ २ आमदार रले होते. त्यामुळे या निवडणुकीत भजपाच्या तिकिटावर जुनेच काँग्रेसचे नेते निवडुकीत पाहायला मिळाले. आता या नेत्यांनां पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर त्यांचे जमिनीचे व्यवहार पुन्हा सुरळीत होणार आहेत. आत्ता मिळालेल्या विजयाने प्रमोद सावंत हे अधिक सुस्थितीत आले आहेत. आता ते केंद्राचे प्रकल्प बहुमताने राज्यात राबवू शकतील.