नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सात राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी संपले. १० मार्च रोजी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर होतील. मात्र, त्यापूर्वी सायंकाळी ७ वाजल्यापासून एक्झिट पोल येण्यास सुरुवात होईल. या एक्झिट पोलमधून भविष्यात कोणते सरकार स्थापन होणार आणि कोणाची स्वप्ने भंगणार हे थोडेसे स्पष्ट होईल. सर्व चॅनेलचे एक्झिट पोल navarashtra.com वर थेट पहा.
उत्तर प्रदेश विधानसभेसाठी सात टप्प्यांत मतदान झाले. पहिला टप्पा १० फेब्रुवारीला तर शेवटच्या टप्प्यात ७ मार्चला मतदान झाले. संपूर्ण उत्तर प्रदेशात सरासरी ६० टक्के मतदान झाले आहे. यावेळी उत्तर प्रदेशा सत्तेत बसलेला भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात थेट लढत झाली. दोन्ही पक्षांचे नेते पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याच्या चर्चा करत आहेत. मात्र, बसपा, काँग्रेसनेही निवडणुकीत पूर्ण ताकद लावली आहे.
पंजाब विधानसभेची निवडणूक ही राज्याच्या इतिहासातील सर्वात मनोरंजक निवडणूक ठरली आहे. यापूर्वी काँग्रेस आणि अकाली भाजप युतीभोवती फिरणारे राजकारण यावेळी पूर्णपणे बदलले आहे. या निवडणुकीत राज्यांतर्गत निवडणूक त्रिकोणी नसून पंचकोनी झाली आहे. काँग्रेस, आप, अकाली-बसपा युती, भाजप-कॅप्टन आघाडी तसेच शेतकरी संघटनांचे पक्षही यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तथापि, २०१७ च्या निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आलेल्या काँग्रेस आणि आप यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे.