भारतातील सर्वात महागडी कार कोणाच्या नावावर? (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जातात. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लक्झरी कार आहेत. बहुतेक लोकांना वाटते की देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याकडे सर्वात महागडी कार असेल पण तसे नाही. मग नक्की कोणाकडे आहे ही कार? याचं उत्तर म्हणजे सर्वात महागडी कार त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्याकडे आहे.
खरं तर अंबानी कुटुंबाकडे अनेक महागड्या कार आहेत. नीता अंबानींकडे ऑडी A9 आहे ज्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. अहवालानुसार, ही ऑडी कार बाजारात उपलब्ध आहे ज्यामध्ये सुमारे 600 हॉर्सपॉवरचे उत्तम इंजिन आहे. या कारचे नक्की वैशिष्ट्य काय हे आपण जाणून घेऊया? (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
बदलता येतो रंग
जर आपण या ऑडी कारची खासियत पाहिली तर त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे या कारचा रंग फक्त एक बटण दाबून बदलता येतो. या कारची पेंट स्कीम इलेक्ट्रिकली तयार करण्यात आली आहे. त्याच वेळी, संपूर्ण जगात अशा फक्त 11 कार विकल्या गेल्या आहेत आणि त्यापैकी एक कार नीता अंबानी यांच्या मालकीची आहे.
34 KM मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 6 लाख रुपये ! ‘या’ कार समोर सगळे ऑटो ब्रँड फेल
शक्तिशाली इंजिन
कंपनीने Audi A9 Chameleon मध्ये 4.0 लिटर V8 इंजिन दिले आहे. हे इंजिन 600 HP ची कमाल शक्ती निर्माण करते. याशिवाय, या कारमध्ये फक्त दोन दरवाजे देण्यात आले आहेत. या कारची लांबी सुमारे ५ मीटर आहे आणि ही कार दिसायला अत्यंत क्लासी आहे. या कारकडे पाहिल्यानंतर नक्कीच नजर हटणार नाही. 100 कोटी किंमत असणारी ही कार नक्कीच डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे.
या कारमध्ये काय आहे खास?
एवढेच नाही तर या कारची विंडशील्ड आणि छप्पर दोन्ही एकाच कारमध्ये एकत्रित करण्यात आले आहेत. याशिवाय, या लक्झरी कारमध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत जी इतर कोणत्याही कारमध्ये दिसत नाहीत. ही कार स्पॅनिश डिझायनर डॅनियल गार्सी यांनी बनवली आहे. ही एक कॉन्सेप्ट कार आहे, जी एका आलिशान टू डोअर कूप म्हणून डिझाइन करण्यात आली आहे आणि त्यात फ्युचरिस्टिक तंत्रज्ञान आणि आलिशान इंटीरियर आहे.
असा रेकॉर्ड पुन्हा होणे नाही ! ‘या’ चिनी Electric Car ने फक्त 3 मिनिटात मिळवली 2 लाख प्री-ऑर्डर
250 किमी/ताशी कमाल वेग
ही कार रस्त्यावर 250 किमी/ताशी कमाल वेग देते. ऑडी A9 ची सुरुवातीची किंमत 2.30 कोटी रुपये आहे. डॅशिंग कार मर्सिडीज-बेंझ मेबॅकबद्दल बोलायचे झाले तर, त्यात हायब्रिड पेट्रोल इंजिन आहे. ही शक्तिशाली कार 3982 ते 5980cc इंजिन पर्याय देते.