फोटो सौजन्य: Social Media
सध्या इलेक्ट्रिक वाहने खूप मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. ग्राहक सुद्धा या बाईक्सना उत्तम प्रतिसाद देत आहे. पण या सर्वात सीएनजी बाईक कधी भारताच्या रस्त्यावर धावेल असा कोणी विचार केला होता का? आज हे शक्य झालं आहे, ते फक्त बजाज ऑटोमुळे.
2024 मध्ये बजाज ऑटोने जगातील पहिली CNG Bike मार्केटमध्ये लाँच केली होती. Bajaj Freedom 125 CNG असे या बाईकचे नाव आहे. ही बाईक लाँच होताच ग्राहकांनी या बाईकच्या बुकिंगसाठी चांगलीच गर्दी केली होती.
बजाज ऑटोने केवळ देशातीलच नाही तर जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करून इतिहास रचला आहे. बजाजची ही सीएनजी मोटरसायकल फ्रीडम 125 लोकांना खूप आवडली आहे. ही बाईक गेल्या वर्षी जुलै महिन्यात लाँच करण्यात आली होती. ऑटोकार प्रोफेशनलच्या अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यांत या बाईकच्या ४० हजारांहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत. चला या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
Auto Expo 2025 गाजवण्यासाठी BMW सज्ज, भारतात पहिल्यांदाच सादर करणार ‘ही’ कार
बजाज फ्रीडम १२५ बाजारात तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे – NG04 डिस्क LED, NG04 ड्रम LED आणि NG04 ड्रम. या बजाज बाईकमध्ये पाच रंगांचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. ही सीएनजी मोटरसायकल रेसिंग रेड, सायबर व्हाइट, इबोनी ब्लॅक, प्युटर ग्रे आणि कॅरिबियन ब्लू रंगांमध्ये येते. जगातील या पहिल्या सीएनजी बाईकची एक्स-शोरूम किंमत 89,997 रुपयांपासून सुरू होते आणि 1,09,997 रुपयांपर्यंत जाते.
बजाज फ्रीडममध्ये 125 सीसी, 4-स्ट्रोक, एअर-कूल्ड इंजिन आहे. या बाईकचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. हे इंजिन 8,000 आरपीएम वर 9.5 पीएस पॉवर आणि 5,000 आरपीएम वर 9.7 एनएम टॉर्क निर्माण करते. या इंजिनसह, ही बाईक 330 किलोमीटरची रेंज आणि 91 किमी प्रति लिटर मायलेज देण्याचा दावा करते. बजाजच्या या सीएनजी बाईकमध्ये 2 लिटर पेट्रोल भरण्याची क्षमता देखील आहे.
Auto Expo 2025 गाजवण्यासाठी BMW सज्ज, भारतात पहिल्यांदाच सादर करणार ‘ही’ कार
गरज पडल्यास बजाजची ही सीएनजी बाईक पेट्रोल मोडमध्येही चालवता येते. या बाईकचा टॉप स्पीड सीएनजी मोडमध्ये 90.5 किमी प्रतितास आणि पेट्रोल मोडमध्ये 93.4 किमी प्रतितास आहे. ही बजाज बाईक सीएनजी मोडमध्ये 200 किमी आणि पेट्रोल मोडमध्ये 130 किमीची रेंज देण्याचा दावा करते.
बजाज फ्रीडम 125 मध्ये टँक शील्डसह ट्रेलीस फ्रेम आहे. या बाईकमध्ये PESO प्रमाणित CNG सिलेंडर देण्यात आला आहे. यासोबतच, मजबूत फ्रंट लूकसाठी फोर्क स्लीव्हज प्रोटेक्टर देखील बसवण्यात आला आहे. बाईकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकमध्ये पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर आहे, त्यासोबत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर देखील उपलब्ध आहे.