फोटो सौजन्य: X
हाय परफॉर्मन्स आणि स्टायलिश लूक असणाऱ्या बाईकची नेहमीच चर्चा होत असते. त्यातही स्ट्रीट फायटर बाईक्सला मार्केटमध्ये विशेष मागणी मिळत असते. आज आपण अशा दोन बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत.
अलीकडेच, यामाहा एमटी-03 च्या किमतीत एक लाख रुपयांपेक्षा अधिकची घट करण्यात आली आहे, ज्यामुळे ती पूर्वीपेक्षा खूपच स्वस्त झाली आहे. किमतीत कपात झाल्यामुळे, ही बाईक ३००-४०० सीसी सेगमेंटमध्ये KTM 390 Duke सोबत स्पर्धा करते. म्हणूनच आज आपण या दोन्ही बाईकच्या किंमत, फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या आधारावर कोणाचा पगडा भारी आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत.
Ola Electric चा मार्केटमध्ये धमाका ! तब्बल 500 KM ची रेंज असणारी इलेक्ट्रिक बाईक केली लाँच
Yamaha MT-03 चे डिझाइन खूपच आकर्षक आहे. या बाईकचा लूक अगदी साधा आणि स्टायलिश ठेवला आहे, जो बाईकला मोठा आणि मस्क्युलर लूक देतो.
KTM 390 Duke चे डिझाइन देखील एमटी-०३ सारखे आकर्षक आणि तीक्ष्ण आहे. याचे एक्सटेंशन आणि एकूण लूक यामुळे ही बाईक खूप स्टायलिश दिसते. त्यामुळे रायडरला ही बाईक राइड करताना एक वेगळाच अनुभव मिळतो.
Yamaha MT-03 मध्ये 321 सीसी, लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन वापरले आहे जे 42 पीएस पॉवर आणि 29.5 एनएम टॉर्क निर्माण करते. त्याच वेळी, त्याचे इंजिन हाय RPM वर अधिक टॉर्क जनरेट करते. यामुळे वळणावळणाच्या रस्त्यांवर ही बाईक चालवणे खूप थ्रिलिंग बनते.
KTM 390 Duke मध्ये 398.63 सीसी लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 46 पीएस पॉवर आणि 39 एनएम टॉर्क निर्माण करते. यामधील इंजिनची क्षमता आणि परफॉर्मन्स खूपच चांगला आहे. याला MT-03 पेक्षा जास्त पॉवर आणि टॉर्क मिळतो.
Yamaha MT-03 मध्ये एक साधा एलसीडी कन्सोल आहे. तसेच त्यात स्लिप-अँड-असिस्ट क्लच नाही. यात प्रगत एलसीडी मीटर कन्सोल, ड्युअल आय पोझिशन लाइट्ससह एलईडी हेडलाइट्स, एलईडी फ्लॅशर्स – फ्रंट आणि रियर, ड्युअल चॅनेल एबीएस, पास स्विच, लो फ्युएल इंडिकेटर अशी फीचर्स आहेत.
‘या’ मेड इन इंडिया कारची जपानी लोकांना भुरळ, रेकॉर्डब्रेक मागणीनंतर बुकिंग थांबवली
KTM 390 Duke मध्ये ५ इंचाचा टीएफटी कन्सोल आहे, ज्यामध्ये म्युझिक कंट्रोल, इनकमिंग कॉल अलर्ट आणि टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सारख्या फीचर्सचा समावेश आहे. या बाईकमध्ये तीन रायडिंग मोड (स्ट्रीट, ट्रेक आणि रेन) आणि पूर्णपणे एलईडी लाइटिंग देखील आहे. तसेच, लाँच कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस आणि सुपरमोटो एबीएस सारखे स्टॅंडर्ड फीचर्स दिले आहे.
भारतीय बाजारात Yamaha MT-03 ची किंमत 1,10,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता 3.50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
KTM 390 Duke ची किंमत 3.13 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही MT-03 पेक्षा 36,764 रुपयांनी स्वस्त आहे.
बाईक खरेदी करताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्याची किंमत. जर तुम्ही बजेट फ्रेंडली किंमतीत उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या स्ट्रीट फायटर बाईकच्या शोधात असाल तर KTM 390 Duke तुमच्यासाठी योग्य आहे. तसेच Yamaha MT-03 सुद्धा एक चांगला पर्याय आहे.