फोटो सौजन्य: iStock
मागील काही वर्षात सनरूफ असणाऱ्या कार्सना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हीच बाब लक्षात घेत आपण हा फिचर असणाऱ्या काही स्वस्तात मस्त अशा कार जाणून घेऊयात.
Tata Sierra चं नाणं खणखणीत वाजलं! फक्त 24 तासात मिळाली ‘तुफान’ बुकिंग
या यादीत सर्वात आधी Hyundai Exter चा समावेश आहे. सनरूफसह येणाऱ्या या मायक्रो SUV च्या S Smart व्हेरिएंटची किंमत 7 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते 81.8 bhp पॉवर निर्माण करते. तसेच, एक्स्टरमध्ये 391 लीटरची मोठी बूट स्पेस उपलब्ध आहे.
Tata Punch ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. या कारमध्ये Adventure S व्हेरिएंटपासून सनरूफचा पर्याय मिळतो, ज्याची किंमत 7 लाख रुपये आहे. Punch मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते 88 hp पॉवर जनरेट करते. ही कार AMT आणि CNG व्हेरिएंट्समध्येही उपलब्ध आहे.
ही संधी हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या वाहनांवर Year End Sale, मिळणार 1.85 लाखांपर्यंतची सूट
सनरूफसह येणारी Hyundai i20 ही एक प्रीमियम हॅचबॅक आहे. याच्या Magna व्हेरिएंटची किंमत 8.27 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन असून ते 87 bhp पॉवर देते. i20 सुमारे 20 kmpl मायलेज देत असून 311 लीटर बूट स्पेस उपलब्ध करून देते.
टाटाची लोकप्रिय हॅचबॅक Altroz च्या Pure S व्हेरिएंटमध्ये सनरूफ देण्यात आला आहे, ज्याची किंमत 7.36 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन असून ते 86.79 bhp पॉवर निर्माण करते. Altroz मध्ये 345 लीटरची बूट स्पेस मिळते.






