फोटो सौजन्य: Pinterest
टाटा मोटर्सने नोव्हेंबरच्या अखेरीस टाटा सिएरा ही मिड साइझ एसयूव्ही लाँच केली होती. या एसयूव्हीची बुकिंग सुरुवात झाल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आतच एक नवीन विक्रम गाठला आहे. चला जाणून घेऊयात या कारला किती बुकिंग मिळाली आहे.
ही संधी हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या वाहनांवर Year End Sale, मिळणार 1.85 लाखांपर्यंतची सूट
टाटा मोटर्सने नोव्हेंबरच्या अखेरीस टाटा सिएरा ही मध्यम आकाराची एसयूव्ही म्हणून लाँच होती. या एसयूव्हीसाठी अवघ्या 24 तासात हजारो बुकिंग मिळाले आहे. या एसयूव्हीला 70000 हून अधिक बुकिंग मिळाल्याचे कंपनीने सांगितले आहे. मात्र, कोणत्या व्हेरिएंटला सर्वाधिक बुकिंग मिळाले आहे याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
टाटा सिएरा एसयूव्हीमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स, कनेक्टेड एलईडी टेललाइट्स, फ्लश डोअर हँडल्स, कॉर्नरिंग फॉग लॅम्प्स, ट्रिपल स्क्रीन, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम, हायपर एचयूडी, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, 360-डिग्री कॅमेरा, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 12 स्पीकर्ससह डॉल्बी ॲटमॉस ऑडिओ सिस्टम, सोनिक शाफ्ट साउंड बार, 5जी कनेक्टिव्हिटी, सेगमेंटमधील सर्वात मोठे पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि इलेक्ट्रिक फ्रंट सीट्स, रिअर सनशेड, एअर प्युरिफायर, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, पॉवर्ड टेलगेट, टेरेन मोड्स, पॅडल शिफ्टर्स यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.
कंपनीने या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 21.29 लाख (एक्स-शोरूम) आहे. येत्ये १५ जानेवारी २०२६ रोजी सिएरा एसयूव्हीची डिलिव्हरी सुरू करेल.






