फोटो सौजन्य: istock
संपूर्ण महाराष्ट्रभर गुलाबी थंडी चालू झाली आहे. हीच थंडी एन्जॉय करण्यासाठी अनेक पर्यटकांची पाऊले माळशेज घाट, माथेरान आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी भेट देत असतात. यात जर तुमच्या कडे स्वतःची कार असेल तर ट्रिप हमखास निघते. परंतु कार लॉंग ट्रीपवर घेऊन जाताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे.
थंडीच्या वातावरणात अनेकदा कारची बॅटरी लवकर संपते किंवा खराब होते असे दिसून येते. तापमान कमी झाल्यावर बॅटरीची क्षमता कमी होऊ लागते. त्यामुळे कार सुरू करण्यात अडचणी येतात. ही समस्या टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धतींबद्दल सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही थंडीत तुमच्या कारची बॅटरी चांगली ठेवू शकता.
नववर्षात कोणती वाहनं होणार स्वस्त आणि महाग? खिश्याला कात्री लागण्याअगोदर जाणून घ्या
हिवाळ्यात बॅटरीची कार्यक्षमता चांगली ठेवण्यासाठी, त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व प्रथम, बॅटरीचे टर्मिनल तपासा आणि तेथे काही गंज आहे का ते पहा. गंज लागल्यास बेकिंग सोडा आणि पाण्याने ते स्वच्छ करा. यामुळे कारच्या बॅटरीची पॉवर वाढेल आणि तिचा परफॉर्मन्सही चांगला राहील.
थंड वातावरणात तुमच्या कारमध्ये कारमध्ये बॅटरी वॉर्मर ठेवा. हे ठेवण्याचा तुम्हाला असा फायदा होईल की तुमची कार थंड असताना देखील बॅटरी सहज गरम करू शकता, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता कायम राहते आणि बॅटरी लवकर खराब होत नाही.
जर तुम्ही कारने कमी अंतराचा प्रवास केला तर त्यामुळे पुन्हा पुन्हा कार सुरू करावी लागते. तसेच बॅटरी देखील लवकर संपू शकते. यामुळे छोट्या प्रवासात बॅटरी पूर्ण चार्ज होण्यास वेळ मिळत नाही. जेव्हा तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागतो तेव्हा कार वापरण्याचा प्रयत्न करा.
इलेक्ट्रिक कारसाठी फक्त ‘हे’ नाव वापरल्यामुळे Mahindra ला चढावी लागली कोर्टाची पायरी
कारमध्ये लाइट्स, हीटर आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम यांसारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स देण्यात आल्या आहेत. जेव्हा हे सर्व चालू राहते, तेव्हा ते अनावश्यकपणे बॅटरी एनर्जी वापरत राहतात. यामुळे जेव्हा तुम्ही कार बंद करता तेव्हा या सर्व गोष्टी बंद करा, जेणेकरून बॅटरीवर दबाव येत नाही आणि तिचे आयुष्यही वाढते.
सिंथेटिक ऑइल थंड हवामानात कार इंजिनसाठी चांगले मानले जाते. यामुळे थंडीच्या वातावरणात इंजिन लवकर सुरू होण्यासही मदत होते. यामुळे बॅटरीवरील दाबही कमी होतो. त्यामुळे बॅटरीचे आयुर्मानही वाढते.