इलेक्ट्रिक कारसाठी फक्त 'हे' नाव वापरल्यामुळे Mahindra ला चढावी लागली कोर्टाची पायरी
देशात अनेक आधुकी कार्स लाँच होत आहे. यातही इलेक्ट्रिक कार्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येणार काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे ही बाब समजून अनेक जण इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहे. नुकतेच देशातील आघडीची कार उत्पादक कंपनी महिंद्राने आपल्या दोन नवीन इलेक्टिक कार्स मार्केटमध्ये लाँच केल्या होत्या. परंतु त्यांच्यापैकी एका कारचे नाव कंपनीलाच भोवले आहे. यामुळे कंपनीला कोर्टाची देखील पायरी चढावी लागली आहे.
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने अलीकडेच त्यांची नवीन इलेक्ट्रिक SUV Mahindra BE 6e देशांतर्गत बाजारात लाँच केली आहे. त्याच्या खास लुक आणि डिझाईन व्यतिरिक्त, ही SUV तिच्या एअरक्राफ्ट स्टाइल केबिनसाठी खूप चर्चेत आहे. पण याच दरम्यान, देशातील आघाडीची एअरलाईन कंपनी इंडिगो कारच्या नावावर वापरल्या जाणाऱ्या ‘6E’ ब्रँडिंगमुळे प्रचंड संतापली, यामुळेच कंपनीने कोर्टाचे दार ठोठावले आहे.
कार खरेदीदारांचे खिस्से होणार रिकामे, Nissan नंतर आता ‘ही’ ऑटो कंपनी वाढवणार कार्सची किंमत
महिंद्राच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही BE 6e मधील ‘6E’ ब्रँडिंग वापरल्याबद्दल इंडिगो एअरलाइन्सने महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईलवर दिल्ली उच्च न्यायालयात ट्रेडमार्क उल्लंघन केल्याप्रकरणी केस फाइल केली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने या प्रकरणी स्टॉक एक्सचेंजला स्पष्टीकरण जारी केले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की त्यांचा ट्रेडमार्क “BE 6e” हा IndiGo च्या स्टँडअलोन “6E” ट्रेडमार्कपेक्षा वेगळा आहे. कंपनीने भर दिला आहे की त्यांच्या ब्रँडिंगमध्ये गोंधळ होण्याची शक्यता नाही कारण ते विमान सेवेऐवजी इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरले जाते.
डिगोने 2015 मध्ये आपला नवीन “6E” ब्रँड सुरू केला. ज्या अंतर्गत कंपनीची हवाई सेवा चालवली जाते. कालांतराने हे नाव कंपनीची ओळख बनले. एअरलाइनकडे जाहिरात, वाहतूक आणि प्रवासी सेवांसह अनेक कॅटेगरीमध्ये हा “6E” ब्रँडनेम ट्रेडमार्क रजिस्टर आहे. आता महिंद्रा आपल्या इलेक्ट्रिक कारमध्येही ‘6e’ वापरत असल्याने विमान कंपनीचा यावर आक्षेप आहे. इंडिगो अनेक ग्राहक-केंद्रित सेवांसाठी “6E” ब्रँडनेम वापरते जसे की 6E प्राइम आणि 6E फ्लेक्स.
कंपनीने या नवीन एसयूव्हीला अतिशय फ्यूचरिस्टिक डिझाइन दिले आहे. कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक-केवळ BE सब-ब्रँड अंतर्गत सादर केलेली ही पहिली SUV आहे. या एसयूव्हीची सुरवातीची किंमत ही 18.90 लाख रुपयांपासून सुरु होते. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची केबिन विमानाच्या डिझाइनपासून प्रेरित आहे ज्यामध्ये फायटर जेट स्टाइल थ्रस्टर उपलब्ध आहे.
BE 6e दोन प्रकारच्या ट्यूनिंगमध्ये सादर केले गेले आहे. म्हणजे 59kWh व्हेरियंट 228hp पॉवर जनरेट करतो. तर 79kWh व्हेरिएंट 281hp पॉवर जनरेट करतो.