फोटो सौजन्य: iStock
2024 चं वर्ष पाहता पाहता संपायला आहे. अनेकांनी तर 31st चा प्लॅन सुद्धा बनवला असेल. नववर्षात अनेक जण नवनवीन गोष्टी खरेदी करत असतात. त्यातच काही जण आपली आवडती बाईक किंवा कार सुद्धा विकत घेताना दिसतात. पण जर तुम्ही सुद्धा यंदाच्या नववर्षात कार किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या वाहनावरील किंमती वाढवण्याचे निर्णय घेतले आहे. यात अद्याप तरी कुठल्याही कंपनीने त्यांच्या वाहनांच्या किंमतीत घट होणार आहे असे सांगितले नाही आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक वस्तूंच्या किंमती कमी किंवा वाढल्या जातात. 2025 मध्ये बाईक आणि कारच्या किंमतीतही बदल केले जाऊ शकते. नवीन वर्षाच्या आगमनापूर्वीच अनेक वाहन निर्मात्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
अशा ऑफर्स देणार तर चर्चा होणार! Volkswagen कडून या कार्सवर लाखो रुपयांचे डिस्काउंट
भारतात बीएमडब्ल्यू बाईक्सची खूप क्रेझ आहे. या कंपनीच्या बाईक्सशिवाय आता स्कूटरही बाजारात दाखल झाल्या आहेत. BMW ची उपकंपनी BMW Motorrad ने जाहीर केले आहे की कंपनी 1 जानेवारीपासून आपल्या सर्व दुचाकींच्या किंमती वाढवणार आहे. बाईक आणि स्कूटरच्या किंमतीत ही वाढ महागाईचा दबाव आणि इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे करण्यात आली आहे.
BMW Motorrad India ने सांगितले की कंपनीच्या सर्व दुचाकींच्या किंमती 2.5 टक्क्यांनी वाढणार आहेत. बाईक आणि स्कूटरच्या नवीन किंमती 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत. BMW Motorrad ने 2017 मध्ये भारतात आपल्या दुचाकींची विक्री सुरू केली. भारतातील लोकांनाही या ब्रँडची उत्पादने आवडतात.
डिसेंबर 2024 मध्ये Renault च्या ‘या’ कार्सवर मिळत आहे भरघोस सूट
ह्युंदाई मोटर इंडियानेही वाहनांच्या किंमती वाढवल्याची माहिती दिली आहे. कंपनीने गुरुवारी, ५ डिसेंबर रोजी जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये, इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कारच्या किंमतीत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी, भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे वाहन उत्पादकांना वाहनांचे स्पेअर पार्टस खरेदी करणेही महाग होत असून, त्याचा परिणाम वाहनांच्या किंमतीवर होणार आहे. नवीन वर्षात ह्युंदाई कारच्या किमतीत २५ हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
मारुती सुझुकीने सुद्धा आज शुक्रवार 6 डिसेंबर रोजी आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. इनपुट कॉस्ट आणि ऑपरेशनल खर्चात वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किंमतीत वाढ होत आहे. वाहन उत्पादक वाहनांच्या किंमती चार टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. कारच्या किंमतीती हा बदल वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार होऊ शकतो.