फोटो सौजन्य: Instagram
रेंज रोव्हर कारची क्रेज भारतात पहिल्यापासूनच खूप प्रमाणात आहे. अनेक जण या कार्सकडे एक विशेष आणि आलिशान कार म्हणून पाहतात. बोललीवूड्चे कलाकार तर नेहमीच आपल्याला या कार्समध्ये वावरताना दिसतात. आता नुकतेच एका बॉलीवूड एक्टरने आपल्या वाढदिवसानिमित्त स्वतःला रेंज रोव्हर कार भेट दिली आहे. कोण आहे हा अभिनेता? चला पाहूया.
रणदीप हुड्डा हा एक हरहुन्नरी अभिनेता आहे. नुकतेच त्याने नव्या कारसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याने काळ्या रंगाची रेंज रोव्हर खरेदी केली आहे आणि ती खूप आकर्षक दिसत आहे. रेंज रोव्हर हे अतिशय प्रिमियम केबिन आणि उत्कृष्ट फीचर्ससाठी ओळखली जाते.
नवीन 13.1-इंचाची फ्लोटिंग इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ही या कारमधील उत्कृष्ट फीचर्स आहेत. यात 35-स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टीम सारखे फीचर्स आहेत जी अॅक्टिव नॉइज कैंसलेशन फीचरने सुसज्ज आहे. हे फिचर वापरून कार आपल्या चाकांचे कंपन, टायर आणि इंजिनचा आवाज फिल्टर करते.
नवीन 13.1-इंचाची फ्लोटिंग इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ही या कारची उत्कृष्ट फिचर आहेत. इतर फीचर्समध्ये हेड-अप डिस्प्ले, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, 4-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि रियर-सीट एंटरटेनमेंट स्क्रीन यांचा समावेश आहे.
टाटाने भारतात रेंज रोव्हरचे काही व्हेरियंट तयार करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे या कारच्या किंमती कमी झाल्या आहेत. या गाड्या आता पुण्यातील उत्पादन प्रकल्पात असेंबल केल्या जात आहेत.
स्थानिक पातळीवर या SUV चे उत्पादन करणारा भारत हा UK बाहेरील पहिला देश ठरला आहे. या हालचालीचा परिणाम असा आहे की या लक्झरी एसयूव्हीच्या किंमती लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत. रेंज रोव्हर 3.0-लिटर डिझेल HSE LWB, ज्याची किंमत पूर्वी 2.8 कोटी रुपये होती, ती आता 2.36 कोटी रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
रणदीप हुड्डा व्यतिरिक्त सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, संजय दत्त, रणबीर कपूर, आलिया भट्ट, निम्रत कौर, आदित्य रॉय कपूर, सोनम कपूर, तेलगू अभिनेता महेश बाबू, मल्याळम अभिनेता मोहनलाल, पूजा हेगडे, आणि कार्तिक आर्यन या लक्झरी एसयूव्हीचे मालक आहेत.