फोटो सौजन्य - Social Media
मारुती सुझुकी भारतीयांच्या महत्वाच्या पसंतीपैकि एक आहे. ही पसंत अगदी फार पूर्वीपासून ग्राहकांमध्ये दिसून आली आहे. मारुती सुझुकी ब्रेझ्झा या ब्रँडची एक खासियत आहे. या गाडीकडे मोठा ग्राहकवर्ग आकर्षित आहे. तसेच या गाडीची विक्रीही अफाट आहे. विशेष माहिती म्हणजे मारुती सुझुकीने ब्रेझ्झाचा चेहरा प्रदर्शित केला आहे. या आकर्षित गाडीसाठी बी टाऊनचा चॅम्प कार्तिक आर्यनची निवड करण्यात आली आहे. मारुती सुझुकी इंडियाने लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यनला मारुती सुझुकी ब्रेझ्झाचा Brand Ambassador म्हणून नियुक्त केले आहे.
ब्रेझ्झा ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV पैकी एक आहे. २०१६ मध्ये ब्रेझ्झा लाँच करण्यात आली होती. मुळात, या गाडीची १२ लाखांहून अधिक विक्री झाली आहे. २०२४ मध्ये या गाडीची एकूण १,८८,१६० युनिट्सने विक्री झाली आहे. २०२४ मध्ये ही सर्वार्धिक विक्री होणारी सब-४ मीटर कॉम्पॅक्ट SUV ठरली आहे. ब्रेझ्झाला टक्कर देण्यासाठी बाजारात Tata Nexon, Hyundai Venue तसेच Kia Sonet आणि Mahindra XUV300 यांसारख्या गाड्या उपस्थित आहेत. या सर्व गाड्यांनी बाजारात एक धुमाकूळ घातली आहे. ब्रेझ्झाच्या तुलनेत, नेक्सॉनने २०२४ मध्ये १,६१,६११ युनिट्सची विक्री केली, व्हेन्यूने १,१७,८१९ युनिट्स आणि सॉनेटने १,०६,६९० युनिट्सची विक्री केली. ब्रेझ्झाची किंमत ₹८,३४,००० ते ₹१४,१४,००० (एक्स-शोरूम) आहे. ही पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
ब्रेझ्झामध्ये K15C १.५-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे १०३ पीएसची जास्तीत जास्त पॉवर आणि १३७ एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायांसह उपलब्ध आहे. याशिवाय, सीएनजी व्हेरिएंट (८८ पीएस/१२१ एनएम) देखील ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह दिला जातो.
ब्रेझ्झामध्ये अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश असून यात एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी टेललॅम्प्स, १६-इंच अलॉय व्हील्स, स्मार्टप्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टीम, हेड-अप डिस्प्ले, ३६०-डिग्री कॅमेरा सिस्टीम, वायरलेस चार्जर, स्टीअरिंगवर माउंट केलेले पॅडल शिफ्टर्स (६-स्पीड एटी), इलेक्ट्रिक सनरूफ आणि सहा एअरबॅग्स यांचा समावेश आहे. याशिवाय, ४० कनेक्टेड फिचर्सही देण्यात आले आहेत. ब्रेझ्झाशिवाय, मारुती सुझुकीकडे फ्रॉन्क्स, जिम्नी आणि ग्रँड विटारा यांसारख्या अन्य एसयूव्ही पर्याय आहेत. कंपनीने अलीकडेच आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही, ई-विटारा, सादर केली असून ती भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.