फोटो सौजन्य: @volklub (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, त्यातीलच एक कंपनी म्हणजे निसान. निसानने देशात अनेक चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. यात सर्वात जास्त डिमांड ही Nissan Magnite ला मिळत आहे. नुकतेच या कारने 2 लाख विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. याच आनंदात कंपनी आता या कारवर आकर्षक डिस्काउंट देत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
निसान मोटर इंडियाने त्यांच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही Nissan Magnite वर ₹86,000 पर्यंतचे बेनिफिट्स जाहीर केले आहेत. कंपनीच्या 2 लाख युनिट्सच्या विक्रीचा आकडा ओलांडल्याबद्दल ही ऑफर दिली जात आहे. या ऑफरच्या संपूर्ण डिटेल्ससाठी, ग्राहकांना डीलरशिपला भेट द्यावी लागेल, जिथे त्यांना सर्व डिटेल्स दिले जातील.
अलीकडेच, निसानने भारतीय बाजारात मॅग्नाइटचे CNG व्हर्जन लाँच केले आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत ₹ 6.89 लाख आहे. अनेक कंपन्या फॅक्टरी-फिटेड सीएनजी किट देतात, निसानने डीलर लेव्हल रेट्रोफिटचा पर्याय निवडला आहे. याचा अर्थ असा की फॅक्टरी सोडल्यानंतर सीएनजी किट अधिकृत केंद्रावर स्थापित केले जाते. यामुळे हा पर्याय अधिक किफायतशीर होतो. विशेषतः ज्यांना जास्त मायलेज हवे आहे त्यांच्यासाठी.
मॅग्नाइट सीएनजी ही एक परवडणारी एसयूव्ही असून यात अनेक चांगले फीचर्स आहेत. या कारमध्ये 8 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, 7 इंचाचा पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे.
प्रवाशांच्या सेफ्टीसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, व्हेईकल डायनॅमिक कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, एबीएस आणि ईबीडी, हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट, हिल स्टार्ट असिस्ट, आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकर आणि हाय-स्पीड अलर्ट यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.
निसान मॅग्नाइटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत टॉप मॉडेलमध्ये 6.14 लाख रुपयांपासून ते 11.76 लाख रुपयांपर्यंत आहे. ही किंमत तुमच्याजवळील शोरूमनुसार बदलू देखील शकते.
निसान मॅग्नाइटच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 1.0-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 72bhp पॉवर आणि 96Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तर दुसरे इंजिन 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनने सुसज्ज आहे, जे जास्तीत जास्त 100bhp पॉवर आणि 160Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. दोन्ही इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. बाजारात, निसान मॅग्नाइट मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, टाटा नेक्सॉन, आणि किया सोनेट सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करते.