फोटो सौजन्य: @popularmaruti/ x.com
भारतात सध्या अनेक कार लाँच होत आहेत, ज्यांना ग्राहकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, इतक्या कार लाँच होत असताना सुद्धा मार्केटमध्ये काही अशा कार देखील आहेत. ज्या आजही लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे मारुती इको.
मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे, जिने विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. कंपनीने व्हॅन सेगमेंटमध्ये Eeco ऑफर केली, जी ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. जर तुम्ही ही व्हॅन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊयात की जर ही व्हॅन दोन लाखांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केली तर याचा EMI किती असेल.
अखेर Maruti Victoris दणक्यात झाली लाँच, वेगवेगळ्या इंजिन ऑप्शनसह मिळेल हाय-फाय फीचर्स
मारुती इकोचा बेस व्हेरिएंट 5.69 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत ऑफर होतो. जर तुम्ही ही व्हॅन दिल्लीमध्ये खरेदी केले तर त्याची ऑन-रोड किंमत 6.40 लाख रुपये होते. 5.69 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त, या किमतीत 32 हजार रुपये आरटीओ आणि 42 हजार रुपये इंश्युरन्स आणि 5600 रुपये फास्टॅग, स्मार्ट कार्ड आणि एमसीडी शुल्क समाविष्ट आहे.
जर या कारचा पेट्रोल इंजिन असलेला बेस व्हेरिएंट आपण खरेदी करत असाल, तर बँकेकडून ex-showroom किंमतीवरच फायनान्स केला जाईल. अशा परिस्थितीत आपण 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर जवळपास 4.40 लाख रुपये बँकेकडून फायनान्स करावे लागतील. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 4.40 लाख रुपये कर्ज देते, तर तुम्हाला दरमहा फक्त ₹7095 इतकी EMI पुढील 7 वर्षांसाठी भरावी लागेल.
जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 4.40 लाख रुपये कार लोन घेतले, तर तुम्हाला 7 वर्षे दरमहा 7095 रुपयांचा EMI द्यावी लागेल. अशा वेळी, 7 वर्षांत तुम्ही एकूण जवळपास 1.55 लाख रुपये फक्त व्याज म्हणून भराल. म्हणजेच, एकूणच कारची किंमत जवळपास 7.95 लाख रुपये होईल.
मारुती सुझुकी इको कमी किमतीत ऑफर केली जाते. अशा परिस्थितीत, तिची कोणत्याही कारशी थेट स्पर्धा नाही. परंतु सात सीटर आणि किंमतीच्या बाबतीत, तिला Renualt Triber MPV शी स्पर्धा करावी लागते.