फोटो सौजन्य: @SnehiShah11/X.com
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार बेस्ट कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. कंपनीने नेहमीच विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. आज म्हणजेच 3 सप्टेंबर 2025 रोजी कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक नवीन कार ऑफर केली आहे.
भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकां कंपन्यांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने आज Maruti Victoris ही एक नवीन एसयूव्ही म्हणून सादर केली आहे. या नवीन एसयूव्हीमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत? इंजिन किती पॉवरफुल आहे? ही कार कोणत्या किंमतीला सादर केली गेली आहे? बाजारात ती कोणत्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात.
मारुतीने व्हिक्टरी एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, कनेक्टेड रियर टेल लाइट्स, शार्क फिन अँटेना, 26.03 सेमी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अंडर बॉडी सीएनजी किट, डॉल्बी अॅटमॉस सिस्टम, अलेक्सा ऑटो व्हॉइस असिस्टंट, जेश्चर कंट्रोल टेलगेट, अँबियंट लाईट , 35 हून अधिक कनेक्टेड फीचर्स, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स अशी फीचर्स आहेत. तसेच, इंटिरिअरमध्ये काळा, राखाडी आणि चांदीचा रंग वापरण्यात आला आहे.
या नवीन एसयूव्हीला भारत एनसीएपीने क्रॅश टेस्टमध्ये पाच स्टार सेफ्टी रेटिंग दिल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यासोबतच 6 एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज सारखी सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.
Honda Motorcycle & Scooter India ला ऑगस्ट 2025 मध्ये सुगीचे दिवस, धडाधड लाखो वाहनांची झाली विक्री
मारुतीच्या नवीन एसयूव्हीमध्ये 1.5 लिटर क्षमतेचे पॉवरफुल इंजिन आहे. जे तिला 100 सीसीची पॉवर आणि न्यूटन मीटरचा टॉर्क देते. यासोबतच, ती सिक्स स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह लाँच करण्यात आली आहे. ही एसयूव्ही मजबूत हायब्रिड तंत्रज्ञान आणि सीएनजी पर्यायासह देखील लाँच करण्यात आली आहे.
मारुतीने लाँच केलेली नवीन एसयूव्ही व्हिक्टोरिस ही मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही एसयूव्ही Hyundai Creta, Kia Seltos, Tata Harrier, MG Hector, Honda Elevate सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल.