फोटो सौजन्य: Pinterest
किआ सायरोसची सुरुवातीची किंमत सुमारे 8.67 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून होते, ज्यामुळे ती थोडी प्रीमियम वाटते. दुसरीकडे, महिंद्रा XUV 3XO ची सुरुवातीची किंमत सुमारे 7.28 लाख (एक्स-शोरूम) पासून होते, ज्यामुळे ती बजेट-फ्रेंडली पर्याय बनते. बजेटमध्ये असलेल्या SUV खरेदीदारांसाठी, XUV 3XO एक सोपा आणि परवडणारी एसयूव्ही ठरेल.
किया सायरोसमध्ये 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 118 bhp निर्माण करते, तर 1.5-लिटर डिझेल इंजिन 114 bhp निर्माण करते. महिंद्रा XUV 3XO परफॉर्मन्सच्या बाबतीत थोडीशी पुढे असल्याचे दिसून येते, कारण त्याचे पेट्रोल इंजिन 111 bhp ते 131 bhp पर्यंतची पॉवर निर्माण करते. शिवाय, त्याचे 1.5-लिटर डिझेल इंजिन 300 Nm चा मजबूत टॉर्क निर्माण करते, जे हायवे ड्रायव्हिंग दरम्यान खूप उपयुक्त आहे.
मायलेजच्या बाबतीत Kia Syros पेट्रोल व्हेरिएंटमध्ये सुमारे 18.2 kmpl, तर डिझेल व्हेरिएंटमध्ये 20.75 kmpl पर्यंत मायलेज देते. दुसरीकडे, Mahindra XUV 3XO पेट्रोलमध्ये सुमारे 20.1 kmpl आणि डिझेलमध्ये 21.2 kmpl पर्यंत मायलेज ऑफर करते. त्यामुळे रोजच्या वापरासाठी आणि कमी इंधनखर्चाच्या दृष्टीने XUV 3XO अधिक किफायतशीर ठरते.
स्पेसच्या बाबतीत, Kia Syros मध्ये 465 लिटरचे मोठे बूट स्पेस देण्यात आले असून, फॅमिली वापरासाठी ही SUV अधिक प्रॅक्टिकल ठरते. तर Mahindra XUV 3XO मध्ये मागील प्रवाशांसाठी उत्तम लेगरूम मिळते, ज्यामुळे लांब प्रवास अधिक आरामदायक होतो.
Kia Syros मध्ये पॅनोरमिक सनरूफ, ड्युअल स्क्रीन सेटअप, वेंटिलेटेड सीट्स आणि लेव्हल-2 ADAS यांसारखी प्रीमियम फीचर्स देण्यात आली आहेत. तर Mahindra XUV 3XO मध्येही 360-डिग्री कॅमेरा, मोठी टचस्क्रीन आणि लेव्हल-2 ADAS सारखी आधुनिक फीचर्स मिळतात.
ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही SUVना Bharat NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. एकूणच, जर तुम्हाला प्रीमियम फीचर्स आणि जास्त बूट स्पेस हवे असतील, तर Kia Syros हा उत्तम पर्याय ठरतो. मात्र, कमी किंमत, अधिक मायलेज आणि दमदार परफॉर्मन्स शोधत असाल, तर Mahindra XUV 3XO अधिक योग्य पर्याय आहे.






