Farhan Akhtar ने खरेदी केली Mercedes Maybach GLS600
भारतात लक्झरी कार्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. यामध्ये बॉलिवूड स्टार्सचा देखील समावेश आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स नेहमीच त्यांच्या आलिशान कारमध्ये फिरताना दिसतात. त्यांच्या या कार्सची किंमत कोटींपासून सुरु होत असते.
भारतात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत. त्यातही सर्वात लोकप्रिय कंपनी म्हणजे Mercedes. मर्सिडीजच्या कार्स फक्त सामन्यांमध्ये नाही तर बॉलिवूड स्टार्समध्ये सुद्धा लोकप्रिय आहेत. नुकतेच अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता फरहान अख्तरने Mercedes-Benz Maybach GLS600 ही नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. चला या कारबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
फेस्टिव्ह सिझनमध्ये ग्राहक Tata Motors वर मेहेरबान! धडाधड विकल्या गेल्या गाड्या
एका व्हिडिओमध्ये, जो Buzzzooka Scrolls यांनी YouTube वर शेअर केला आहे, त्यात फरहान अख्तर आपल्या नव्या लक्झरी कारमध्ये बांद्रा परिसरात दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये पाहता येते की कार थांबताच फरहान मागील सीटवरून खाली उतरतो. कारच्या समोर फुलांनी सजावट केलेली आहे आणि ग्रिलवर माळ लावलेली दिसते, ज्यावरून स्पष्ट होते की ही कार थेट डिलरशिपवरून घरी ड्राइव्ह करून आणली आहे.
Mercedes Maybach GLS600 ही भारतात Mercedes-Benz कंपनीची सर्वात महाग SUV आहे. ही कार फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे आणि CBU (Completely Built Unit) स्वरूपात भारतात आयात केली जाते. या फ्लॅगशिप SUV चा डिझाइन अतिशय प्रीमियम आहे. यात मोठे क्रोम-फिनिश केलेले ग्रिल, बी-पिलरवर क्रोम ॲक्सेंट आणि डी-पिलरवर आयकॉनिक मेबॅक चिन्ह यासारखे डिझाइन फीचर्स आहेत.
HSRP बसवण्यात पुणे आरटीओ आघाडीवर, अंतिम मुदत किती आहे? दंड आकारण्याचा आराखडा तयार
इंजिनच्या बाबतीत, Maybach GLS600 मध्ये 4.0-litre V8 engine देण्यात आले आहे, जो 48V mild-hybrid system सोबत कार्य करतो. हा सेटअप सुमारे 557 एचपी पॉवर आणि 730 Nm टॉर्क निर्माण करतो. तसेच, हायब्रिड युनिट आवश्यकतेनुसार अतिरिक्त 22 एचपी पॉवर आणि 250 टॉर्क पुरवते.
या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे, ज्यामुळे ती भारतीय बाजारपेठेतील सर्वात प्रीमियम कार्सपैकी एक बनते.






