फोटो सौजन्य: iStock
हिवाळ्याचा ऋतू चालू झाला आहे. या मोसमात प्रत्येकालाच गुलाबी थंडी अनुभवायची असते. म्हणूनच अनेक जण थंड हवेच्या ठिकाणांना भेट देत असतात. या मोसमात कित्येक जण महाबळेश्वर, माळशेज घाट, माथेरान आणि इत्यादी पर्यटन स्थळांना भेट देत असतात. अशा पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी अनेक जण आपल्या कारला लॉंग ट्रीपवर घेऊन जातात.
हल्ली शहरी भागात इलेक्ट्रिक कार्सचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अनके जण इलेक्ट्रिक कार्सचा लॉंग ट्रीपसाठी वापर करताना दिसतात. हिवाळ्यात अनेकदा कार चालवताना अनेकदा ती बंद पडते. यामुळेचज आज आपण हिवळ्यात इलेक्ट्रिक कार चालवताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे याबद्दल जाणून घेऊया.
तुम्ही तुमची कार पार्क करता तेव्हा, शक्य असल्यास शेड असणाऱ्या गॅरेजमध्ये ती पार्क करा. वास्तविक, थंडीच्या वातावरणात कारची बॅटरी लवकर डाउन होते, त्यामुळे कार सुरू करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जेव्हा कार गॅरेजमध्ये पार्क केली जाते, तेव्हा तिची उष्णता दीर्घ कालावधीसाठी बॅटरी चांगली ठेवण्यास मदत करेल. तसेच, गरम हवेत ठेवलेली बॅटरी उघड्यावर पार्क केलेल्या कारपेक्षा वाईट कामगिरी करेल.
बऱ्याच इलेक्ट्रिक कार मोबाईल-नियंत्रित ॲप्ससह येतात जे कारला प्री-हीट करण्यात मदत करतात. प्री-कंडिशनिंगमुळे तुम्हाला कारमधील पहिल्या काही मिनिटांत उद्भवणाऱ्या समस्या टाळण्यास मदत होते. त्याच वेळी, जर तुम्ही प्रवास सुरू करण्यापूर्वी तुमच्या कारचे हीटर चालू केले तर ते आतील भाग देखील गरम करेल.
नवीन कलर ऑप्शन आणि काही बदलांसह BMW M340i झाली लाँच
लिथियम प्लेटिंग बॅटरीचे हिवाळ्यात जास्त नुकसान होते. जेव्हा फास्ट चार्जिंग केले जाते तेव्हा ते अधिक गरम होते. त्यामुळे या बॅटरींनी कार फास्ट चार्ज करण्यास मनाई आहे. या बॅटरीसह येणारी वाहने सामान्य चार्जरनेच चार्ज करा.
खूप थंड वातावरण असल्यावर टायरचा हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे कारच्या टायरचे दाब नियमितपणे तपासत राहा. टायरचा हवेचा दाब योग्य असेल तर इलेक्ट्रिक कारही योग्य रेंज देते. त्याची रेंज वाढवण्यासही मदत होते.
कारमध्ये एअरबॅग असून सुद्धा ‘ही’ खबरदारी बाळगा
इलेक्ट्रिक कार इंधनावर चालणारी इंजिन वापरत नाहीत, त्यामुळे कारचे केबिन गरम करण्यासाठी हीटर पूर्ण क्षमतेने चालवल्याने तुमच्या कारची बॅटरी लवकर संपेल. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही हीटेड सीट फीचर वापरू शकता. यामुळे तुमच्या ईव्हीची रेंज वाढू शकते आणि तुम्हाला ती पुन्हा पुन्हा चार्ज करावी लागणार नाही.