फोटो सौजन्य: Pinterest
तर दुसरीकडे, Taisor, Hyryder, Rumion, Hilux, Camry, Vellfire आणि Land Cruiser 300 च्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. टोयोटाने केवळ किमती वाढवल्या नाहीत तर काही मॉडेल्सच्या व्हेरिएंट लाइन-अपमध्येही सुधारणा केली आहे.
Hyundai कडून Discount Offer जाहीर! ‘या’ कारवर सर्वाधिक पैसे वाचवण्याची संधी
टोयोटाची डिझेल लॅडर-फ्रेम MPV, इनोव्हा क्रिस्टाची किंमत जानेवारी 2026 मध्ये 33000 रुपयांपर्यंत वाढली आहे. इनोव्हा क्रिस्टाची किंमत आता 18.99 लाख ते 25.53 लाख रुपयांपर्यंत आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही इनोव्हा क्रिस्टाची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त बजेट करावे लागेल.
जानेवारी 2026 मध्ये, इनोव्हा हायक्रॉसच्या खरेदीदारांना मोठा धक्का बसला आहे. या कारच्या किमतीत 48000 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. इनोव्हा हायक्रॉसची नवीन एक्स-शोरूम किंमत 19.15 लाख ते 32.38 लाख रुपयांपर्यंत आहे. Base G व्हेरिएंट बंद करण्यात आला आहे. Hycross च्या हायब्रिड आणि टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंटच्या खरेदीदारांना थेट फटका बसला आहे.
जानेवारी 2026 मध्ये Toyota Fortuner (Legender सह) च्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. आता या SUV ची एक्स-शोरूम किंमत 34.16 लाख रुपयांपासून 49.59 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एकूणच पाहता Fortuner आता पूर्वीपेक्षा अधिक महाग झाली आहे.
2.5 लाखांची सूट देऊन सुद्धा Kawasaki Ninja च्या ‘या’ Bike ची किंमत तब्बल 18.29 लाख रुपये!
मात्र दिलासादायक बाब म्हणजे Toyota च्या काही मॉडेल्सच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये Taisor, Hyryder, Rumion, Hilux, Camry, Vellfire आणि Land Cruiser 300 या गाड्यांचा समावेश आहे.






