‘चेरी-जेएलआर’ कंपनीने आपल्या मोस्ट अवेटेड ‘Freelander 8’ या प्रीमियम एसयूव्हीच्या इंटीरियरची पहिली अधिकृत झलक सादर केली आहे. या वर्षाच्या शेवटी चीनच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी या कारच्या केबिनचे लूक समोर आले आहे. ही गाडी नवनवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कारच्या प्लॅटफॉर्मचा प्रभाव टाटा मोटर्सच्या आगामी ‘Tata Avinya EV’ सिरीजवर पाहायला मिळू शकतो, असे संकेत काही रिपोर्ट्समधून मिळाले आहेत, आणि बोललं जात आहे.
केबिनमध्ये ४६.३ इंचाचा मोठा 8K डिस्प्ले
इतर प्रीमियम एसयूव्हींप्रमाणे डॅशबोर्डवर वेगवेगळ्या स्क्रीन लावण्याऐवजी, ‘Freelander 8’ मध्ये एक अतिशय मिनिमलिस्टिक रचना करण्यात आली आहे.
लक्झरी घड्याळांप्रमाणे फिजिकल बटन्स आणि क्रिस्टल नोब्स
आजकालच्या बहुतांश गाड्यांमधून बटन्स गायब होत असताना, चेरी-जेएलआरने मात्र ग्राहकांच्या सोयीसाठी महत्त्वाचे फिजिकल बटन्स तसेच ठेवले आहेत.

कारच्या पुढच्या सीटिंग एरियामध्ये दोन्ही प्रवाशांना वेगळा अनुभव मिळेल,
हुवावे आणि स्नॅपड्रॅगनचे अत्याधुनिक तंत्रज्ञान
तंत्रज्ञानाच्या बाबतीत ही कार खूप पुढे आहे,
ऑटोमोबाईल जगतातील चर्चांनुसार, ज्या प्लॅटफॉर्मवर ही ‘Freelander’ रेंज तयार होत आहे, त्याच प्लॅटफॉर्मचा वापर टाटा मोटर्स आपल्या आगामी ‘Avinya EV’ गाड्यांसाठी करणार आहे. त्यामुळे आता ‘Freelander 8’ चे हे हायटेक इंटीरियर आणि केबिन डिझाईन टाटाच्या आगामी आलिशान इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये पाहायला मिळणार का, याकडे भारतीय ऑटोमोबाईल प्रेमींचे लक्ष लागले आहे.






