फोटो सौजन्य: iStock
भारतात जरी बजेट फ्रेंडली कार्सची विक्री मोठ्या प्रमाणात होत असली तरी लक्झरी कारची मागणी देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आजही रस्त्यावर एखादी लक्झरी कार धावताना दिसली की आपसूकच अनेकांच्या नजरा त्यावर रोखल्या जातात. तसेच अनेक नेते आणि सेलिब्रेटी मंडळी सुद्धा आपल्या कार कलेक्शनमध्ये लक्झरी कार्सचा समावेश करत असतात. यामुळे लाझकरी कार्सची सामन्यांमध्ये देखील चांगलीच क्रेझ आहे. नुकतेच FY 2025 मधील कार्सचा सेल्स रिपोर्ट जरी करण्यात आला आहे. ज्यात लक्झरी कार्सच्या विक्रीला अच्छे दिन आले आहे.
भारतात लक्झरी कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. २०२५ या आर्थिक वर्षात या वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील लोकांनी अनेक लक्झरी वैशिष्ट्यांसह कार खरेदी केल्या आहेत. मर्सिडीजपासून लँड रोव्हरपर्यंत आणि बीएमडब्ल्यूपासून ऑडीपर्यंतच्या गाड्या लोकांना आवडत आहेत.
उद्या लाँच Volkswagen Tiguan R Line SUV, मिळणार दमदार फीचर्स आणि इंजिन
भारतात लक्झरी कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. 2025 या आर्थिक वर्षात या वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशातील लोकांनी अनेक लक्झरी कार खरेदी केल्या आहेत. मर्सिडीजपासून लँड रोव्हरपर्यंत आणि बीएमडब्ल्यूपासून ऑडीपर्यंतच्या कार्स लोकांना आवडत आहेत.
FY2025 मध्ये लक्झरी कारच्या विक्रीत Mercedes-Benz चे वर्चस्व राहिले आहे. गेल्या आर्थिक वर्षात, मर्सिडीजने भारतात 18,928 युनिट्स विकल्या, जे 2023-24 च्या आर्थिक वर्षापेक्षा 4 टक्के जास्त आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, मर्सिडीजची आतापर्यंतच्या कोणत्याही आर्थिक वर्षातली ही सर्वाधिक विक्री आहे. मर्सिडीजची सर्वात जास्त आवडलेली कार E-Class LWB बनली. मर्सिडीजचा दावा आहे की ब्रँडच्या टॉप-एंड कार्सना, ज्यांची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये आहे, भारतात जास्त मागणी दिसून आली आहे.
आर्थिक वर्ष 2025 मध्ये जग्वार लँड रोव्हरची विक्री बंपर झाली आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या तुलनेत यावेळी या ब्रँडच्या वाहनांची विक्री 40 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 17 वर्षात जॅग्वार लँड रोव्हर भारतात आल्यापासूनची ही सर्वात मोठी विक्री असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये, या ब्रँडच्या 6,183 वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या दोन वर्षांत या वाहनांची रिटेल सेल्स जवळजवळ दुप्पट झाली आहे.
जर Honda CB300R मध्ये दिसली ‘ही’ समस्या तर तात्काळ कंपनीला करा संपर्क, फुकटात होईल दुरुस्ती
लेक्सस इंडियाने ऑफिशियल सेल्स डेटा जारी केलेला नाही, परंतु कंपनीचा दावा आहे की FY2025 मध्ये भारतातील लेक्ससच्या विक्रीत 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएमडब्ल्यू ग्रुपने या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचाच डेटा जारी केला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीत 3,914 युनिट्स विकल्या, ज्यामध्ये 3,764 बीएमडब्ल्यू आणि 150 मिनी कारचा समावेश होता. आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीत ऑडीने 1,223 वाहने विकली. कंपनीचा दावा आहे की आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत ऑडीच्या विक्रीत 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे.