फोटो सौजन्य; @volkswagenindia (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल बाजार हा जगातील सर्वात मोठा बाजार आहे, त्यामुळेच तर अनेक ऑटो कंपन्यांची नजर येथे असते. त्यातही भारतीय मार्केटमध्ये सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. हीच वाढती मागणी पाहता, अनेक ऑटो कंपन्या देशात दमदार एसयूव्ही लाँच करत असतात. आता जर्मनी वाहन उत्पादक कंपनी फोक्सवॅगन देखील एक नवीन एसयूव्ही लाँच करणार आहे.
उद्या भारतीय बाजारात फोक्सवॅगन टिगुआन आर लाइन एसयूव्ही अनधिकृतपणे लाँच होणार आहे. या एसयूव्हीमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले जातील? त्याचे इंजिन किती शक्तिशाली असेल? ही कार किती किमतीत लाँच केली जाऊ शकते? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात.
जर Honda CB300R मध्ये दिसली ‘ही’ समस्या तर तात्काळ कंपनीला करा संपर्क, फुकटात होईल दुरुस्ती
टिगुआन आर-लाइन एसयूव्ही उद्या भारतात लाँच केली जाईल. ही एसयूव्ही फोक्सवॅगन डूल साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणली जाणार आहे. यासाठी बुकिंग आधीच सुरू झाले आहे.
फोक्सवॅगन टिगुआन आर लाईनमध्ये 2-लिटर टीएसआय इव्हो इंजिन असेल. या इंजिनसह, एसयूव्हीला 204 पीएस पॉवर आणि 320 न्यूटन मीटर टॉर्क मिळेल. यात 7 स्पीड डीएसजी ट्रान्समिशन दिले जाईल. यासोबतच, त्यात 4 मोशन ऑल व्हील ड्राइव्ह क्षमता असेल, ज्यामुळे ही कार कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर चालवता येईल.
उन्हाळ्यातील ‘या’ 3 चुका करतील तुमच्या कारला भस्मसात, वेळीच राहा सावध
फोक्सवॅगन टिगुआन आर लाईनमध्ये कंपनीकडून अनेक उत्तम फीचर्सचा समावेश असेल. लाँचिंगपूर्वी एसयूव्हीच्या अनेक फीचर्सची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. यात 15 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम स्क्रीन दिला जाईल. यासोबतच वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आयडीए व्हॉइस असिस्टंट, रोटरी कंट्रोलरसह स्क्रीन, हेड-अप डिस्प्ले, आठ स्पीकर ऑडिओ सिस्टम, असे अनेक फीचर्स दिले जातील. यासोबतच, मल्टी झोन क्लायमेट कंट्रोल, दोन वायरलेस चार्जिंग पॉड्स, अँबियंट लाईट, पॅनोरॅमिक सनरूफ, मॅट्रिक्स हेडलाइट, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट, एलईडी डीआरएल, रूफ रेल यासारखे फीचर्स देखील यात दिले जातील. सेफ्टीसाठी, एसयूव्हीमध्ये नऊ एअरबॅग्ज, टीपीएमएस, हिल स्टार्ट असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल, पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक, 21 फीचर्ससह Level 2 ADAS सारख्या सेफ्टी फीचर्ससह प्रदान केले जाईल.
फोक्सवॅगन टिगुआन आर लाईनची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सुमारे 40 लाख रुपये असू शकते. विशेष म्हणजे ही एसयूव्ही भारतात सीबीयू म्हणून सादर केली जाईल.