फोटो सौजन्य: Freepik
इलेक्ट्रिक कार्सची क्रेझ ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढत असतानाच लोकांचा कल आता इलेक्ट्रिक कार्सकडे वळत आहे. पर्यावरणपूरक, मेंटेनन्सचा खर्च कमी आणि अश्या अनेक गोष्टींमुळे इलेक्ट्रिक कार्सची विक्री ही मोठ्या संख्येने होत आहे. यंदाच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या किंमतीत घट होईल अशी मागणी अनेक तज्ज्ञ व सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात आली होती. हीच मागणी आता सरकारने सत्यात उतरवली आहे.
लिथियम-आयन बॅटरी होणार स्वस्त
यंदाच्या बजेटमध्ये एकीकडे सरकारने मोबाईल्स स्वस्त करण्याचा निर्णय केला आहे, तर दुसरीकडे इलेक्ट्रिक कार्सदेखील स्वस्त झाले आहे. इलेकट्रीक कार स्वस्त होण्यामागील एक महत्वाचे कारण म्हणजे लिथियम आयन बॅटरीवरील किंमतीत होणारी घट. कुठल्याही कारमधील सर्वात महाग असते ते कारमधील बॅटरी. पण आता बॅटरी स्वस्त झाल्यामुळे इलेक्ट्रिक कार्स सुद्धा स्वस्त होणार आहे.
या आहेत भारतातील टॉप इलेक्ट्रिक कार्स
Tata Tigor EV: ही कार भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कारंपैकी एक आहे. ही एक फायदेशीर आणि व्यावहारिक कार आहे जी एका चार्जवर 306 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.
MG ZS EV: ही भारतातील आणखी एक लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहे. Tigor EV पेक्षा ही थोडी मोठी आणि अधिक प्रीमियम कार आहे. ही कार एका चार्जवर 419 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.
Hyundai Kona Electric: ही एक स्टायलिश आणि स्पोर्टी इलेक्ट्रिक कार आहे जी एका चार्जवर 407 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. यासह या कारमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स सुद्धा दिले आहेत.
मॅक्सस ई-सूत्रा: इलेक्ट्रिक वाहनाच्या शोधात असलेल्या कुटुंबांसाठी ही कार एक चांगला पर्याय आहे. या कारची कार्यक्षमता खूप उत्तम असून, ही एका चार्जवर 343 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.