(फोटो सौजन्य-AI एआय)
किंमतीतील फरक
होंडा QC3 ची एक्स-शोरूम किंमत दिल्लीमध्ये ₹1.35 लाख आहे. ही स्कूटर सध्या सिंगल फुली-लोडेड व्हेरिएंटमध्ये 5 शहरांमध्ये विकली जात आहे. दुसरीकडे एथर कोनार्कची सुरुवातीची किंमत बंगळुरूमध्ये ₹99,999 असून टॉप व्हेरिएंटची किंमत ₹1,44,999 पर्यंत जाते. कोनार्क S आणि Z अशा 2 ट्रिममध्ये एकूण 6 व्हेरिएंटमध्ये येते.
बॅटरी ऑप्शन
बॅटरीच्या बाबतीत एथर कोनार्क S मध्ये 2.1 kWh, 2.7 kWh आणि 3.5 kWh असे पर्याय मिळतात. त्यांची IDC रेंज अनुक्रमे 100 किमी, 125 किमी आणि 161 किमी आहे. भविष्यात 200 किमी IDC रेंज असलेला व्हेरिएंटही येणार आहे. कोनार्क Z मध्ये 2.7 kWh आणि 3.5 kWh बॅटरी पर्याय मिळतात.
होंडा QC3 मध्ये 3.0 kWh बॅटरी पॅक असून कंपनीच्या दाव्यानुसार ती फुल चार्जवर 145 किमी IDC रेंज देते. 0 ते 80 टक्के चार्जिंगसाठी सुमारे 2 तास 40 मिनिटे लागतात, तर पूर्ण चार्ज होण्यासाठी जवळपास 4 तास लागतात.
Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक
फीचर्समध्ये कोण अव्वल..
फीचर्समध्ये एथर कोनार्क आक्रमकपणे पुढे जाते. यात 14-इंच फ्रंट आणि 12-इंच रिअर अलॉय व्हील्स, इल्यूमिनेटेड एथर ब्रँडिंग, अॅनिमेटेड रॅपअराउंड लॅम्प्स, अॅडजस्टेबल बॅकरेस्ट, SmartWake, MagicKey, AutoPop आणि AirWalk यांसारखी फीचर्स आहेत. होंडा QC3 मध्ये 5-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, Honda RoadSync, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, Smart Key आणि 32-लिटर अंडरसीट स्टोरेज मिळते.
एकूणच, होंडा QC3 ही फॅमिली वापरासाठी साधी आणि प्रॅक्टिकल इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून सादर करण्यात आली आहे. एथर कोनार्कमध्ये मात्र जास्त बॅटरी ऑप्शन, विविध रेंज आणि टेक्नोलॉजी-सेंटरड फीचर्स दिल्याने कस्टमर्सना निवडीचे जास्त ऑप्शन मिळतात.






