फोटो सौजन्य: iStock
दिवाळी जवळ येत आहे. अनेकांच्या घरी नवीन गोष्टी खरेदी खरेदी करण्याची तयारी सुरु झाली असेल. या शुभ काळात बहुतेक लोकं नवीन बाईक किंवा कार घेताना दिसतात. तर काही जण आपली जुनी कार विकतात. शेवटी एकाद्या व्यक्तीसाठी जून असणारी कार दुसऱ्यासाठी नवीन असू शकते ना. पण जेव्हा आपण जुनी कार विकायला काढतो तेव्हा एक प्रश्न मनाला पडतो तो म्हणजे आपल्या योग्य कारची किंमत कशी ठरवावी? म्हणूनच आज आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या कारची योग्य किंमत ठरवू शकता.
जुन्या कारची किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते जसे की कारचे मॉडेल, ब्रँड, कारची स्थिती आणि ती किती वर्षे वापरली गेली आहे. जर तुम्हाला तुमच्या जुन्या कारची किंमत घरी बसून जाणून घ्यायची असेल, तर OLX, CarDekho, Droom आणि Cars24 सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तुमच्या कारचे मॉडेल आणि व्हेरियंटची किंमत तपासू शकता.
हे देखील वाचा: होंडा कडून देशातील पहिली E85 Flex Fuel बाईक लाँच, किंमत सर्वसामान्यांना परवडणारी
जुन्या कारची किंमत त्याच्या कंडिशनवर अवलंबून असते. जर तुम्ही तुमची कार चांगली ठेवली असेल तर याला कोणत्याही मोठ्या दुरुस्तीची आवश्यकता नाही. तसेच कारचे पेंट, टायर, बॅटरी यासह सर्व काही चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला कारची चांगली रिसेल व्हॅल्यू मिळेल.
जुन्या कारची किंमत देखील तिचे वय आणि मायलेजवर अवलंबून असते. साधारणपणे, 5 वर्षांपर्यंत जुन्या आणि 50,000 ते 70,000 किलोमीटर चालवलेल्या कार्सना चांगली किंमत मिळते. तसेच, ज्यांचे मायलेज 20 किमी/किमी पर्यंत आहे त्यांना देखील चांगली किंमत मिळते, परंतु जसजसे कारचे वय वाढते तसतसे त्याची किंमत कमी होते.
काही कार उत्पादक कंपनीज अशा आहेत ज्यांच्या कार्सला सेकंड-हँड मार्केटमध्ये चांगली रिसेल व्हॅल्यू मिळते. उदाहरणार्थ, मारुती सुझुकी, टोयोटा आणि होंडा यांसारख्या कंपनीजच्या कार्स त्यांच्या दीर्घ आयुष्य आणि मेंटेनन्स सुलभतेमुळे जास्त किंमतीत विकल्या जातात. एवढेच नाही तर पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कारचे रिसेल व्हॅल्यू वेगळी असते.
सेकंड हॅन्ड कारचे योग्य व्हॅल्यू मोजणे हे थोडे संशोधन आणि त्याची नेमकी कंडिशन यावर अवलंबून असते. वर नमूद केलेल्या गोष्टींचे अनुसरण करून, तुम्ही तुमच्या कारची योग्य किंमत ठरवू शकता.