फोटो सौजन्य: Social Media
भारतात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. मारुती सुझुकी ही त्यातीलच एक कंपनी. मारुती सुझुकीने देशात ग्राहकांच्या मागणी आणि आवडीनुसार बेस्ट कार ऑफर केल्या आहेत. ग्राहकांचा देखील कंपनीवर चांगला विश्वास आहे. त्यामुळेच तर जेव्हा कधीही ग्राहक कार खरेदी करण्यास जातो, तेव्हा तो पहिल्यांदा मारुती सुझुकीच्या कार्सना प्राधान्य देतो.
एसयूव्ही सेगमेंटच्या वाहनांसोबतच, हॅचबॅक कार देखील भारतात मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. आघाडीच्या ऑटोमोबाईल उत्पादकांपैकी एक असलेली मारुती सुझुकी प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये Maruti Baleno विकते. जर तुम्ही या कारचा सीएनजी व्हेरियंट घरी आणण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, दरमहा किती ईएमआय भरून ही कार घरी आणता येईल, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी या कारची किंमत जाणून घेऊया.
तुमच्या रुबाबाला शोभेल अशा स्पेशल डार्क एडिशन लूकमध्ये येतात ‘या’ 5 SUV, किंमत फक्त…
मारुतीकडून सीएनजी व्हेरियंटमध्ये बलेनो देखील ऑफर केली जाते. कंपनी ही प्रीमियम हॅचबॅकचा सीएनजी व्हेरियंटमध्ये 8.44 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. जर ही कार राजधानी दिल्लीतून खरेदी केले तर 8.44 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह रजिस्ट्रेशन आणि इंश्युरन्स देखील भरावा लागेल. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन टॅक्स म्हणून अंदाजे 17000 रुपये आणि इंश्युरन्ससाठी देखील अतिरिक्त पैसे रुपये द्यावे लागतील. अन्य खर्चासह या कारची दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत 9.66 लाख रुपये होते.
इलेक्ट्रिक की पेट्रोल, रोजच्या वापरासाठी कोणते इलेक्ट्रिक स्कूटर ठरेल बेस्ट?
जर तुम्ही मारुती बलेनोचा सीएनजी व्हेरियंट खरेदी केले तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच तुम्हाला फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 7.66 लाख रुपयांचे फायनान्स करावे लागेल. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने सात वर्षांसाठी 7.66 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा फक्त 12331 रुपये ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 7.66 लाख रुपयांचे कार कर्ज घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 12331 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला मारुती बलेनोच्या सीएनजी व्हेरियंटसाठी सुमारे 2.69 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 12.35 लाख रुपये होईल. ज्यामुळे नक्कीच ग्राहकांनाच खिस्सा अजूनच रिकामा होईल.