हत्येच्या दिवशी कोणत्या कारमध्ये होते बाबा सिद्दीकी? बुलेटप्रूफ कार असूनही काच तोडून गेली होती गोळी
सध्या मुंबईत गुन्हगारी वाढताना दिसत आहे. नुकतेच दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्राचे पूर्व मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांची रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
हे हत्याकांड शनिवारी 12 ऑक्टोबरच्या रात्री घडले होते. मुंबईतील वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ते कारमध्ये बसले होते. बाबा सिद्दीकी यांची ही कार बुलेट प्रूफ असूनही पिस्तुलातून झाडलेली गोळी कारची काच फोडून त्यांच्या अंगावर आदळली. यानंतर बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु उपचार होण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. अशावेळी प्रश्न उद्भवतो की ते कोणत्या कारमधून प्रवास करत होते.
बाबा सिद्दीकी यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये बाबा सिद्दीकी रेंज रोव्हर कारमधून आपल्या घरी जात असल्याचे दिसत आहे. रेंज रोव्हर कार अनेक आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे. असे असतानाही बंदुकीची गोळी काचेतून आरपार गेली, ज्यामुळे बाबा सिद्दीकी यांना आपला जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या छातीत आणि पोटात 2-3 गोळ्या लागल्या आहेत.
#WATCH | Maharashtra: Visuals of the car in which NCP leader Baba Siddique was shot at in Mumbai’s Nirmal Nagar area.
He was shifted to Lilavati Hospital where he succumbed to bullet injuries. pic.twitter.com/DfZsN4zhTp
— ANI (@ANI) October 12, 2024
लँड रोव्हर रेंज रोव्हर ही अनेक लक्झरी फीचर्सनी सुसज्ज असलेली कार आहे. हाय परफॉर्मन्ससोबतच ही कार अनेक उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स देखील प्रदान करते. या कारला 360-डिग्री शील्ड ऑफ प्रोटेक्शन आहे. ही कार 7.62 मिमी उच्च हाय पॉवर रायफलच्या हल्ल्याला तोंड देण्यासही सक्षम आहे. कंपनीचा दावा आहे की कारखाली दोन DM51 हँडग्रेनेडचा एकाचवेळी स्फोट होऊनही ही कार पुढे जाऊ शकते.
हे देखील वाचा: Maruti Suzuki बनविले आहे ‘हे’ खास तंत्र, म्हणूनच कार देतात जबरदस्त मायलेज !
माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबारात 9.9 एमएम पिस्तुलचा वापर करण्यात आला होता. हे पिस्तूल पोलिसांनी सध्या जप्त केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचे पिस्तूल इतके अत्याधुनिक होते की त्या गोळीने बुलेट प्रूफ कारच्या काचेतही छेद केला.