फोटो सौजन्य: Pinterest
Maruti Victoris ही नवीन एसयूव्ही आता देशातील सर्वात परवडणारी हायब्रिड एसयूव्ही बनली आहे. तिने Maruti Grand Vitara और Toyota Urban Cruiser Hyryder ला थेट मागे टाकले आहे. मारुती व्हिक्टोरिस केवळ परवडणारी नाही तर तिच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक फ्युएल एफिशियंट कार देखील आहे.
Renault झाली मालामाल! December 2025 च्या विक्रीत जबरदस्त वाढ, जाणून घ्या Sales Report
Maruti Victoris च्या हायब्रिड व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 16.38 लाख रुपयांपासून 19.99 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. तुलनेत पाहिले तर Maruti Grand Vitara हायब्रिडची सुरुवातीची किंमत 16.99 लाख रुपये असून Toyota Hyryder हायब्रिड 16.81 लाख रुपयांपासून उपलब्ध आहे. यामुळे कमी किंमतीत अधिक फीचर्स आणि उत्तम मायलेज देणारी Victoris ग्राहकांसाठी अधिक व्हॅल्यू फॉर मनी ठरत आहे.
Victoris मध्ये 1.5-लिटर स्ट्रॉंग हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 92.5 hp ची पॉवर आणि 122 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत e-CVT गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मायलेजच्या बाबतीत Victoris ने आपल्या सेगमेंटमधील सर्व कार्सना मागे टाकले आहे. ARAI नुसार ही SUV 28.65 kmpl इतके मायलेज देते. हा आकडा Victoris ला केवळ सेगमेंटमध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतीय बाजारातील सर्वाधिक फ्युएल-इफिशिएंट SUVs पैकी एक बनवतो.
अरे बाईक आहे की लक्झरी कार? किंमत इतकी जास्त की दारात दोन Fortuner उभ्या राहतील!
Maruti ने Victoris ला फीचर्सच्या बाबतीतही अत्यंत प्रीमियम बनवले आहे. यामध्ये 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय 8-स्पीकर सराउंड साउंड सिस्टम, 8-वे अॅडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरामिक सनरूफ आणि Alexa AI व्हॉइस असिस्टंट मिळतो.
SUV मध्ये Suzuki Connect द्वारे 60 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स, पॉवर टेलगेट, जेस्चर कंट्रोल आणि अॅम्बियंट लाइटिंगसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत.
Maruti Victoris Hybrid सेफ्टीच्या बाबतीतही उत्तम आणि मजबूत आहे. यात 6 एअरबॅग्स, ABS, ESP, ट्रॅक्शन कंट्रोल आणि हिल असिस्ट ही स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स दिली आहेत. याशिवाय 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि लेव्हल-2 ADAS पॅकेज मिळते. ADAS अंतर्गत ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट यांसारखी प्रगत फीचर्स दिली आहेत. विशेष म्हणजे Victoris ला BNCAP आणि GNCAP या दोन्ही संस्थांकडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
Victoris ही Maruti ची पहिली SUV आहे ज्यामध्ये ADAS (Advanced Driver Assistance Systems) फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय ऑप्शनल ALLGRIP Select ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम आणि मल्टी-टेरेन ड्राइव्ह मोड्सही यात उपलब्ध आहेत. त्यामुळे ही SUV शहरातील वापरासोबतच ऑफ-रोडिंगसाठीही एक विश्वासार्ह पर्याय ठरू शकते.






