फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात पंचांक योग ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून आहे. याला अंगुलिया किंवा द्वंद योग देखील म्हणतात. कारण हा योग सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांचा संबंध दर्शवतो. हा योग ज्यावेळी तयार होतो ज्यावेळी दोन ग्रह एकमेकांपासून 72 अंशांवर असतात. याला सुखद, सौभाग्यवर्धक आणि रचनात्मक योग म्हटले जाते. ज्याचा राशीवर जास्त प्रभाव पडतो.
पंचांगानुसार 4 जानेवारी रोजी सूर्य आणि पंचांक योग तयार होत आहे जे या वर्षातील पहिला योग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या योगाचा नवीन वर्षात काही राशीच्या लोकांवर नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण यावर प्रभाव पडेल. समाजामध्ये प्रतिष्ठा आणि मान सन्मान वाढेल. कोणत्या राशीच्या लोकांना पंचांग योगाचा फायदा होणार आहे ते जाणून घ्या
पंचांक हा पंचांगातील दिवसाचा महत्त्वाचा भाग आहे. यात तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच घटकांचा विचार करून दिवसाचा शुभ-अशुभ योग ठरवला जातो. पंचांक योग चांगला असल्यास कोणतेही काम यशस्वी होण्याची शक्यता वाढते. हा योग आज रविवार, 4 जानेवारी रोजी तयार होत असून आर्थिक, आरोग्य आणि करिअर संबंधित कामांसाठी हा योग खूप फायदेशीर मानला जातो.
या योगाचा परिणाम मेष राशीच्या लोकांवर होताना दिसेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. समाजात मान सन्मान वाढेल. कुटुंबामध्ये सुख शांती राहील. आरोग्य चांगले राहील. मानसिक ताण दूर राहील. नवीन योजना करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल राहील.
सिंह राशींच्या लोकांसाठी हा योग फायदेशीर राहील. करिअरमध्ये प्रगती होईल. जुने वाद दूर होतील. आत्मविश्वास वाढेल. नवीन मित्र मंडळी तुमच्यासाठी फायदेशीर राहील. प्रवास करू शकता. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. शिक्षण आणि व्यवसायात यश मिळेल. मानसिक शांतता मिळेल. कलेशी संबंधित कार्यामध्ये अपेक्षित यश मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी हा योग फायदेशीर राहील. खूप मेहनत घेतल्यास अपेक्षित यश मिळेल. दीर्घकाळापासून अडकलेले काम पूर्ण होईल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. समस्या दूर होतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबातील वातावरण अनुकूल राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: पंचांक हा पंचांगातील दिवसाचा महत्वाचा घटक आहे. यात तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच घटकांचा विचार करून दिवसाचा शुभ-अशुभ योग ठरवला जातो. योग्य पंचांकमध्ये सुरू केलेले कार्य यशस्वी ठरते.
Ans: हा वर्ष 2026 चा पहिला पंचांक योग आहे. या दिवशी योग्य नियोजन, पूजा व कर्म केल्यास आर्थिक, करिअर व वैयक्तिक जीवनात सुवर्णसंधी निर्माण होते.
Ans: पंचांक योगाचा मेष, सिंह, तूळ आणि मकर राशीच्या लोकांना फायदा होईल






