रविवार होईल आणखीनच मजेदार! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चविष्ट चमचमीत स्टफ इडली
रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. सुट्टीच्या दिवशी घरातील सगळ्या सदस्यांना सुट्टी असते. त्यामुळे संपूर्ण दिवस आरामात असतो. रविवारी अनेक घरांमध्ये कायमच विकतचे पदार्थ आणून खाल्लेले जातात. मेदुवडा, मसाला डोसा, वडापाव, भजी इत्यादी तेलकट पदार्थ सकाळच्या नाश्त्यात खाल्ल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे अपचन आणि ऍसिडिटीची समस्या वाढून आरोग्य बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चमचमीत स्टफ इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. स्टफ इडलीसोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सांबर सुद्धा खाऊ शकता. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे. स्टफ इडली कायमच बाहेरून विकत आणून खाल्ली जाते. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया स्टफ इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






