कोणत्या कार्सची किंमत महागणार (फोटो सौजन्य - कारवाले)
भारतीय बाजारपेठेत कार कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवत असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत आणि या भागात, आता बातमी आली आहे की १ जुलैपासून, JSW MG मोटर इंडियादेखील त्यांच्या कारच्या किमती वाढवणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की MG कार किती महाग होतील, म्हणूनच या लेखातून आम्ही सांगण्याचा हा आटापिटा करतोय. कंपनी १ जुलैपासून त्यांच्या बहुतेक कार आणि SUV च्या किमती १.५ टक्क्यांपर्यंत वाढवेल. जर तुम्ही MG च्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या EV विंडसर आणि विंडसर प्रो सोबत इतर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर पुढील महिन्यापासून तुमचा खिसा अधिक सैल होणार आहे.
EV Vs Petrol: पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त झाले इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे, रिसर्चमध्ये आकडे आले समोर
किंमती का वाढत आहेत?
JSW MG मोटरने एका निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या उत्पादन खर्चाचा आणि इतर समष्टिगत आर्थिक घटकांचा प्रभाव कमी करण्यासाठी ही किंमत सुधारणा केली जात आहे. यापूर्वी देखील, या वर्षी ज्या कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत, त्या सर्वांचा एकच युक्तिवाद होता की वाढत्या इनपुट खर्चामुळे आम्हाला किंमत वाढवावी लागत आहे. हेदेखील खरे आहे की ज्या पद्धतीने महागाई वाढत आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीच्या किमतीही वाढत आहेत आणि कारसारख्या लक्झरी वस्तूही दिवसेंदिवस महाग होत आहेत, ज्यामुळे ग्राहकांवर भार वाढत आहे असे सांगण्यात आले आहे
किती आहे MG Cars च्या किमती
JSW MG मोटर इंडिया भारतीय बाजारात एकूण 7 वाहने विकते, ज्यामध्ये एक हॅचबॅक आणि एक Multi Utility Vehicle तसेच 5 SUV समाविष्ट आहेत. त्यांच्या किमती 7.36 लाख रुपयांपासून सुरू होतात आणि 46.24 लाख रुपयांपर्यंत जातात. आता जर आम्ही तुम्हाला मॉडेलनुसार किंमतीबद्दल सांगितले तर, कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या विंडसर EV ची किंमत 14 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 18.31 लाख रुपयांपर्यंत जाते. त्याच वेळी, MG Comet EV ची किंमत 7.36 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.86 लाख रुपयांपर्यंत जाते.
MG Hector ची किंमत
MG Hector ची किंमत 14,25 लाख रुपयांपासून सुरू होऊन 23.14 लाख रुपयांपर्यंत आहे. एमजी हेक्टर प्लसची किंमत 17.50 लाख रुपयांपासून सुरू होऊन 23.94 लाख रुपयांपर्यंत आहे. एमजी अॅस्टरची किंमत 11.30 लाख रुपयांपासून सुरू होऊन 17.56 लाख रुपयांपर्यंत आहे. एमजी झेडएस ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 17.99 लाख रुपयांपासून सुरू होऊन 20.50 लाख रुपयांपर्यंत आहे. एमजी ग्लोस्टरची किंमत 41.05 लाख रुपयांपासून सुरू होऊन 46.24 लाख रुपयांपर्यंत आहे. या सर्व एक्स-शोरूम किंमती आहेत.