फोटो सौजन्य: Social Media
देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे ग्राहक सुद्धा इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी खरेदी करण्यास प्राधान्य देत आहे. आतापर्यंत आपण अनेक हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक कार, स्कूटर आणि बाईक पाहिल्या असतील. पण आता लवकरच भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक ट्रक धावताना दिसणार आहे.
राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत मोबिलिटी 2025 अंतर्गत ऑटो एक्स्पो 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. जिथे अनेक वाहन उत्पादक नवीन उत्पादने सादर आणि लाँच करत आहेत. Omega Seiki नावाच्या कंपनीने व्यावसायिक वाहन विभागात एक नवीन इलेक्ट्रिक ट्रक लाँच केला आहे. या ट्रकमध्ये किती शक्तिशाली बॅटरी दिली आहे. हा ट्रक किती वजन उचलू शकतो? याची किंमत काय असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
Bharat Mobility Global Expo 2025: हिरो मोटोकॉर्पकडून ‘या’ प्रीमियम बाईक आणि स्कूटर लाँच
ओमेगा सेकीने ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये एक नवीन इलेक्ट्रिक ट्रक लाँच केला आहे. कंपनीने त्याचे नाव M1KA 1.0 ठेवले आहे. यासोबतच कंपनीने M1KA 3.0 मॉडेल देखील सादर केले आहे.
ओमेगा सेकीने लाँच केलेला M1KA 1.0 इलेक्ट्रिक ट्रक फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह आणला गेला आहे. यात 10.24, 15 आणि 21 किलोवॅट प्रति तास क्षमतेचे तीन बॅटरी पर्याय आहेत. ज्यामुळे एका चार्जमध्ये हा ट्रक 90, 120 आणि 170 किलोमीटरची रेंज मिळवते. त्यात बसवलेले वॉटर कूल्ड पर्मनंट सिंक्रोनस मॅग्नेट मोटर 67 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. हा ट्रक जास्तीत जास्त ५० किलोमीटर प्रति तास वेगाने चालवता येतो. त्याचा ग्राउंड क्लिअरन्स 175 मिमी ठेवण्यात आला आहे. त्याची बॅटरी चार्ज होण्यासाठी 15 मिनिटे ते दोन तास लागतात.
अखेर Maruti Suzuki ची पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार e Vitara सादर, ‘या’ 7 कॉन्सेप्ट कारची दिसली झलक
कंपनीने माहिती दिली आहे की या ट्रकमध्ये लवकरच फिक्स्ड बॅटरी व्यतिरिक्त स्वॅपेबल बॅटरीचा पर्याय देखील सादर केला जाईल. त्यानंतर चार्जिंग करताना लागणारा वेळ वाचू शकेल आणि ड्रायव्हर अधिक राइड्स घेऊन अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील.
कंपनीने त्यात ऑन-बोर्ड चार्जर, एलईडी हेडलाइट, आयओटी, आर पास, टीएफटी डिस्प्ले कंपॅटिबल, १२ इंच व्हील दिले आहेत.
ओमेगा सेकीने लाँच केलेला नवीन ट्रक M1KA 1.0 हा उच्च पेलोड क्षमतेचा ट्रक म्हणून आणण्यात आला आहे. जो जास्तीत जास्त ८५० किलो पर्यंत भार उचलू शकतो.
कंपनीने नवीन इलेक्ट्रिक ट्रक M1KA 1.0 ची एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख रुपये ठेवली आहे. सध्या हा ट्रक 49999 रुपयांना बुक करता येईल. या ट्रकची डिलिव्हरी एप्रिल २०२५ पासून सुरू होईल. कंपनीने या ट्रकसाठी आकर्षक फायनान्स स्कीम दिल्या आहेत. तसेच पाच वर्षे किंवा १.५ लाख किलोमीटरची वॉरंटी देखील या ट्रकसोबत दिली जात आहे.