अजूनही ज्या वाहनधारकाने एचएसआरपी नंबर बसवला नाही आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. धावपळ करणाऱ्या वाहनधारकांना राज्य सरकारने आता तिसरी मुदत वाढ दिली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी (HSRP) नंबर बसवण्यास सक्ती आणली गेली आहे. सरकारने आता अंतिम मुदत वाढ १५ ऑगस्टपर्यंत दिली आहे. ही शेवटची संधी असून, यानंतर ‘एचएसआरपी’ नसलेल्या जुन्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
Bihar Election : बिहार निवडणुकांसाठी NDA चा मास्टर प्लान ठरला; या नेत्याच्या नेतृत्वात लढणार निवडणूक
‘एचएसआरपी’ नंबर (उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी) तयार करणाऱ्याकडून विलंब होत असल्याने कंपन्यांकडे धीम्या गतीने पुरवठा होत आहे. अनेक फिटमेंट केंद्रे बंद झाली आहेत. त्यामुळे अर्ज करूनही जुन्या वाहनधारकांना संबंधित कंपन्यांकडून ‘एचएसआरपी’ नंबर मिळत नसल्याचे वास्तव आहे. यावर उपाय करून तातडीने ‘एचएसआरपी’ उपलब्ध होतील, यासाठी राज्य सरकारने वाहनचालकांना मुदतवाढ दिली. मुदतवाढ देताना संबंधित कंपन्यांना मोठ्या प्रमाणात ‘एचएसआरपी’ तयार करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे, असे राज्य वाहनचालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.
राज्यातील ६० प्रादेशिक-उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांची तीन मंडळांत विभागणी केली आहे. तीन मंडळांसाठी मेसर्स रोजमर्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, मेसर्स रियल मेजॉन इंडिया लिमिटेड, मेसर्स एफ टी ए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड अशा तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यात जवळपास दोन कोटी जुन्या वाहने आहेत. आतपर्यंत २३ लक्ष जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्यात आले आहेत. ४० लाख वाहनधारकांनी ‘एचएसआरपी’ साठीची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली आहे. जवळपास सव्वा कोटी वाहने अद्याप एचएसआरपी’च्या कक्षेबाहेर आहेत. एप्रिल २०१९नंतर नोंदणी होणाऱ्या नव्या वाहनांना डीलरकडून ‘एचएसआरपी’ बसवण्यात येत आहेत.
भल्याभल्या VVIP लोकांकडे नसतील, अशा आलिशान कार PM Modi यांच्या ताफ्यात; किंमत 10 कोटी रुपये