महिंद्राची ‘फॉर्म्युला E’ रेसिंग कार, जी त्यांनी मागच्याच वर्षी लाँच केली होती. त्या कारने मोनॅको मधील Monaco E Prix हे जगप्रसिद्ध टूर्नामेंट जिंकलेले आहे. फॉर्म्युला E च्या तिसऱ्या जनरेशनचा भारतीयांसाठी हा पहिलाच विजय असेल. या कार रेस बद्दल आणि या विजयाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
मागच्या महिन्यात म्हणजे 16 आणि 17 मे ला मोनॅको मध्ये पार पडलेल्या या Monaco E-Prix या टूर्नामेंट मध्ये महिंद्राच्या ‘फॉर्म्युला E’ कारने विजय पटकावला. या कारचे रेसिंग ड्रायवर Nyck de Vries (नीक दे व्रीस) हे डच रेसिंग ड्रायवर होते.
Formula One पुन्हा येणार भारतात, केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केले प्रयत्न
महिंद्राची M12ELECTRO – Formula E Racing Car
महिंद्राने नोव्हेंबर २०२५ मध्ये आपली ही रेसिंग कार लाँच केली होती. आणि नुकत्याच झालेल्या मोनॅको मधील टूर्नामेंट मध्ये या कारने विजय मिळवला. या कारबद्दल बोलायचं झालं तर, या कारचा ताशी वेग 320 किमी आहे. 840 किलो एवढ्या वजनाच्या या कारचे इंजिन पावर 350 KW एवढे आहे. शिवाय ही कार 600 kw च्या चार्ज कॅपबिलिटी बरोबर येते.
मोनॅकोच्या टूर्नामेंट मधील रेसिंग ड्रायवर
मोनॅको मधील सर्किट दे मोनॅको इथे झालेल्या Monaco E-Prix या टूर्नामेंट मध्ये ज्या डच रेसिंग ड्रायवरने महिन्द्राला हे यश मिळवून दिले त्यांचे नाव नीक दे व्रीस (Nyck de Vries) असे आहे. त्यांनी 2021 च्या Formula E कारचे वर्ल्ड चॅम्पियनशिप पद जिंकले आहे. ही कार रेस करताना नीक यांनी जॅग्वारच्या मिक एवांस यांना टक्कर देत 2.67 सेकंदांनी ही स्पर्धा जिंकली.
फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप आत्मनिर्भर भारतातील महत्वाचा …
Monaco E-Prix टूर्नामेंट काय आहे
Monaco E-Prix ही जगातील एक प्रतिष्ठित इलेक्ट्रिक कार रेसिंगची स्पर्धा आहे. ही स्पर्धा मोनॅकोच्या प्रसिद्ध स्ट्रीट सर्किटवर आयोजित केली जाते. ही स्पर्धा पूर्णपणे इलेक्ट्रिक रेस कार साठीचं आहे, आणि Formula E च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपचा भाग आहे. पर्यावरणपूर्ण तंत्रज्ञान, वेगवान शर्यतींबरोबर विना प्रदूषण मोटरस्पोर्ट म्हणून या Monaco E-Prix कडे पाहीले जाते.






