फोटो सौजन्य: iStock
देशात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या मार्केटमध्ये बेस्ट कार ऑफर करत आहे. पण ज्याप्रमाणे ग्राहकांना उत्तम कार ऑफर करणे महत्वाचे, त्याचप्रमाणे एखादी नवीन कार खराब झाल्यास तिला त्या कंपनीने दुरुस्त करणे देखील महत्वाचे. यामुळेच तर ग्राहकांचा विश्वास त्या कंपनीवर नेहमी राहतो.
जेव्हा एखादी नवीन कार खराब होते, तेव्हा त्याच्या कारमालक गोंधळले जातात. अशावेळी ती कार उत्पादित करणाऱ्या कंपनीची जबाबदारी असते की त्या कारची योग्यरीत्या सर्व्हिसिंग करावी. नुकतेच देशातील आघाडीच्या ऑटो कंपनीने म्हणजेच होंडाने आपल्या कार परत बोलावल्या आहे. नेमके झाले काय? चला जाणून घेऊया.
होंडा गाड्यांच्या इंजिनमध्ये समस्या आली आहे. अमेरिकेत वाहन उत्पादकांनी सुमारे २.९५ लाख वाहने परत मागवली आहेत. नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनच्या मते, फ्युएल इंजेक्शन इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटच्या सॉफ्टवेअरमधील दोषामुळे इंजिनची शक्ती कमी होत आहे. म्हणूनच ऑटोमेकर्सनी बुधवार, दि. २९ जानेवारी २०२५ रोजी एक प्रेस रिलीज जारी करून इंधन इंजेक्शन इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटच्या खराब प्रोग्रामिंगबद्दल माहिती दिली आहे.
भारतात बनणारी ‘ही’ कार आता जपानमध्ये घालणार धुमाकूळ, तब्बल 100 देशात केली जाते निर्यात
होंडाने एका प्रेस रिलीजमध्ये माहिती दिली की कारच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे थ्रॉटलमध्ये अचानक बदल होऊ शकतो, ज्यामुळे इंजिनची ड्राइव्ह पॉवर कमी होऊ शकते, इंजिन अधूनमधून चालू शकते किंवा ते अचानक बंद देखील होऊ शकते. वाहन चालवताना अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्यास कोणताही मोठा अपघात होऊ शकतो.
होंडाने म्हटले आहे की ज्या वाहनांच्या मॉडेल्समध्ये इंजिन समस्या येत आहेत त्यांच्या मालकांशी मार्चमध्ये ईमेलद्वारे संपर्क साधला जाईल. या मेलमध्ये, त्या कार मालकांना त्यांची वाहने होंडाच्या अधिकृत किंवा अक्युरा डीलरकडे घेऊन जाण्यास आणि तेथे FI-ECU सॉफ्टवेअर अपडेट करण्यास सांगितले जाईल. यासाठी कार मालकांना कोणतीही किंमत मोजावी लागणार नाही.
स्पोर्ट्स बाईकलाही लाजवेल ‘ही’ EV ; किंमत 1 लाखांपेक्षा कमी, फीचर्स वाचाल तर आजच कराल बुक
होंडाने कार मालकांसाठी ग्राहक सेवा क्रमांक देखील जारी केला आहे. कार मालक 1-888-234-2138 या क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवू शकतात. या रिकॉलसाठी होंडाने EL1 आणि AL0 क्रमांक दिले आहेत. याशिवाय, कार मालक NHTSA च्या वाहन सुरक्षा हॉटलाइनवर 1-888-327-4236 वर कॉल करून किंवा nhtsa.gov या वेबसाइटला भेट देऊन देखील माहिती मिळवू शकतात.