फोटो सौजन्य- iStock
भारतातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकी नवीन कार एडिशन लवकरच लॉंच करणार आहे. कंपनी लोकप्रिय कार Dzire ची नवीन जनरेशन 2025 भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. हा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो जानेवारी 2025 मध्ये भारतात होणार आहे. डिझायरची नवीन जनरेशन मध्ये स्विफ्ट सारखी डिझाइन असू शकते. नवीन डिझाइन बदलामुळे डिझायर कारची बाजारपेठ क्षेत्र वाढ होणार आहे.
Maruti Suzuki Dzire मधील बदल
मारुती डिझायरच्या नवीन जनरेशमध्ये होणारा पहिला मोठा बदल म्हणजे सनरूफ. अलीकडेच यासंबंधी प्रतिमांनी असे उघड केले आहे की सेडानमध्ये स्प्लिट ग्रिल डिझाइन असेल आणि सुझुकीचा लोगो मध्यभागी असणार आहे. स्विफ्टच्या नवीन जनरेशनशी डिजारचे जनरेशन याबाबतीत साम्य साधते. नवीन डिझायरला नवीन डिझाइन केलेले ड्युअल-टोन अलॉय व्हील्स मिळणार आहे मात्र कारचे साइड प्रोफाइल समान राहणार आहे. सेडानला नवीन शैलीतील एलईडी टेल लॅम्प, पुन्हा डिझाइन केलेले बंपर अशा अनेक घटक मिळू शकतात. केबिनचा विचार केल्यास, अनेक सुधारणा आहेत आणि त्यात डॅशबोर्ड आणि सेंटर कन्सोलचा समावेश आहे.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Maruti Suzuki Dzire पेट्रोल इंजिन
डिझायरच्या इंजिनचा विचार केला तर ते इंजिन स्विफ्ट सारखेच असणार आहे. नवीन स्विफ्टला Z-Series 1.2-लिटर तीन-सिलेंडर NA पेट्रोल इंजिन मिळते आणि ते 82hp पॉवर आणि 112Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह 5-स्पीड AMT साठी पर्यायासह जोडलेले आहे.
Maruti Suzuki Dzire चे वैशिष्ट्ये
या नव्या कारच्या वैशिष्ट्यांचा विचार केल्यास, कारमध्ये 9-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन, ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन HVAC नियंत्रणे आणि 4.2-इंच डिजिटल MID (Multi information display ) सोबत सेगमेंट-फर्स्ट इलेक्ट्रिक सनरूफ यांसारखी वैशिष्ट्ये असण्याची अपेक्षा केली जात आहे. मारुती सुझुकीची तगडी स्पर्धक कंपनी होंडा या वर्षाच्या अखेरीस अमेझची तिसरी जनरेशन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. Dzire मुळे ग्राहकांना सेडान प्रकारात नवीन एडीशन पर्याय म्हणून उपलब्ध होणार आहे. मारुती सुझुकीसाठी हे सेडान मॉडेल बाजारपेठेसाठी महत्वाचे ठरणार आहे. पुढच्या वर्षी कंपनीकडून हे मॉडेल लॉंच होण्याची अपेक्षा आहे.