फोटो सौजन्य: Social Media
भारतात बाईक्स प्रमाणेच स्कूटरच्या विक्रीत देखील झपाट्याने वाढ होत आहे. स्कूटर या बाईकपेक्षा चालवण्याच्या बाबतीत खूप सोयीस्कर असतात. तसेच ट्रॅफिकमध्ये बाईकच्या तुलनेत स्कूटर आरामात चालवता येते. असे अनेक उदाहरण आहेत जिथे स्कूटर बाईक पेक्षा खूप वरचढ ठरते.
भारतीय मार्केटमध्ये अनेक लोकप्रिय स्कूटर उपलब्ध आहे. Suzuki Access ही त्यातीलच एक. नुकतेच सुझुकी मोटरसायकलने भारतीय मार्केटमध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय स्कूटर, नवीन सुझुकी ॲक्सेस लाँच केली आहे. या नवीन ॲक्सेसचे नाव Suzuki Access Ride Connect TFT Edition आहे. त्यात अनेक नवीन फीचर्स समाविष्ट करण्यासोबतच, लूकमध्येही थोडे बदल करण्यात आले आहेत. चला या नवीन स्कूटरबद्दल जाणून घेऊयात.
Yamaha : ‘या’ बाईक आणि स्कूटरना मिळणार १० वर्षांची वॉरंटी, कंपनीने आणली शानदार ऑफर
सुझुकी राइड कनेक्टसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये 4.2 -इंचाचा कलर थिन-फिल्म ट्रान्झिस्टर (TFT) डिस्प्ले आहे, जो रायडरला एक स्वच्छ आणि सुधारित लेआउट देतो, जो रायडरला आवश्यक माहिती प्रदान करतो. त्यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिली आहे. याचा डिस्प्ले अशा प्रकारे डिझाइन केला आहे की दिवस असो वा रात्र, प्रत्येक परिस्थितीत माहिती सहज दिसून येते. डिस्प्ले रायडरला स्पीड, इंधन आणि नेव्हिगेशन सारखी महत्त्वाची माहिती देतो.
सुझुकी अॅक्सेस राइड कनेक्ट टीएफटी एडिशनमध्ये 124 सीसी एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे जे 8.42 पीएस पॉवर आणि 10.2 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन आता OBD2B अनुरूप आहे.
सुझुकी अॅक्सेस राईड कनेक्ट टीएफटी एडिशन पूर्णपणे नवीन कलर स्कीममध्ये लाँच करण्यात आले आहे. यात नवीन पर्ल मॅट अॅक्वा सिल्व्हर आणण्यात आले आहे आणि त्याला मॅट फिनिश देण्यात आला आहे, ज्यामुळे ते खूपच स्टायलिश आणि आकर्षक दिसते. याशिवाय, ही स्कूटर मॅट ब्लॅक, स्टेलर ब्लू, ग्रेस व्हाइट आणि आइस ग्रीन सारख्या जुन्या रंगांमध्ये देखील उपलब्ध असेल. ही स्कूटर पूर्वीसारखीच हाय स्पीड, चांगले मायलेज आणि आरामदायी रायडिंग अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
सुझुकी अॅक्सेस राइड कनेक्ट टीएफटी एडिशन भारतात ₹ 1,01,900 च्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. ही किंमत तुमच्याजवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते. ही स्कूटर भारतातील सुझुकी मोटरसायकल डीलरशिपवर उपलब्ध आहे.