फोेटो सौजन्य: Social Media
भारतात अशा अनेक बेस्ट ऑटो कंपन्या आहेत, ज्या ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या कार मार्केटमध्ये लाँच करत असतात. यातीलच एक महत्वाची ऑटो कंपनी म्हणजे होंडा. आजही ग्राहक होंडाच्या कार विश्वासाने खरेदी करत असतात. याच ग्राहकांच्या प्रेमामुळे तर कंपनी नवनवीन कार बाजारात आणत असते.
जपानी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी होंडा भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तमोत्तम कार ऑफर करते. 2024 च्या अखेरीस कंपनीने नवीन होंडा अमेझ लाँच केली होती. आता नवीन वर्षात ही कार खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. चला जाणून घेऊया, कंपनी ग्राहकांना कोणती ऑफर देत आहे.
अखेर Maruti Suzuki ची पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार e Vitara सादर, ‘या’ 7 कॉन्सेप्ट कारची दिसली झलक
होंडा कार्सकडून भारतीय बाजारपेठेत नवीन जनरेशनची अमेझ सादर केली गेली आहे. या कारच्या लाँचच्या वेळीच ही कार प्रास्ताविक म्हणजेच इंट्रोडक्टरी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता ही कार याच इंट्रोडक्टरी किंमतीत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत खरेदी करता येणार आहे.
नवीन जनरेशनच्या होंडा अमेझ २०२४ मध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. यात एलईडी बाय-प्रोजेक्टर हेडलाइट्स, 15-इंच टायर्स, फ्लोटिंग टचस्क्रीन, सात-इंच टीएफटी टचस्क्रीन सेमी-डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल एसीसह टॉगल स्विच, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो अशी अनेक फीचर्स आहेत.
होंडा अमेझ २०२४ मध्ये, कंपनीने कारमध्ये खूप चांगले सेफ्टी फीचर्स दिली आहेत. यात कार लोकेशन, जिओ फेंस अलर्ट, ऑटो क्रॅश नोटिफिकेशन, ड्राइव्ह व्ह्यू रेकॉर्डर, चोरीला गेलेला वाहन ट्रॅकिंग, स्पीडिंग अलर्ट, अनधिकृत प्रवेश अलर्ट असे २८ हून अधिक अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स आहेत. यामध्ये लेव्हल-२ ADAS देखील देण्यात आला आहे, जो या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच कोणत्याही कारमध्ये देण्यात आला आहे. यासोबतच, सहा एअरबॅग्ज, तीन पॉइंट सीटबेल्ट, VSA, ELR, ट्रॅक्शन कंट्रोल, HSA, EBD, ABS, ESS, ISOFIX चाइल्ड अँकरेज, रियर पार्किंग सेन्सर हे स्टॅंडर्ड फीचर्स म्हणून देण्यात आले आहेत.
काय लूक आहे राव ! Auto Expo 2025 मध्ये BMW S 1000 RR आणि R 1300 GSA झाल्या लाँच
होंडाच्या नवीन जनरेशनमधील अमेझ 2024 मध्ये १.२ लिटर क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. ज्यामुळे या कारला ९० पीएसची पॉवर आणि ११० न्यूटन मीटरचा टॉर्क मिळेल. नवीन अमेझमध्ये होंडा दोन ट्रान्समिशन पर्याय देईल. त्यात मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशन असेल. मॅन्युअल ट्रान्समिशनसह ते १८.६५ किलोमीटर प्रति लिटर आणि सीव्हीटीसह १९.४६ किलोमीटर प्रति लिटर मायलेज देईल.
होंडा अमेझ 2024 कंपनी व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्स व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. लाँचच्या वेळी, या नवीन कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ८ लाख रुपये ठेवण्यात आली होती. सध्या, ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ही कार या किंमतीत खरेदी करता येईल. कॉम्पॅक्ट सेडान कारचा मिड व्हेरियंट ९.१० लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करता येईल. होंडा अमेझ २०२४ चा झेडएक्स व्हेरियंट ९.६९ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत घरी आणता येईल.