फोटो सौजन्य: Social Media
भारतातील विश्वासाची आणि अग्रगण्य ऑटो कंपनी मारुती सुझुकीने आतापर्यंत अनेक उत्तम कार लाँच केल्या आहेत. पण आता वाढत्या इलेक्ट्रिक कारच्या मागणीकडे पाहता कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंट अखेर आपली दमदार इलेक्ट्रिक कार सादर केली आहे.
सध्या देशात भारत मोबिलिटी ग्लोअब्ल एक्स्पो 2025 हा ऑटो इव्हेन्ट सुरू झाला आहे. या ऑटो एक्स्पोमध्ये अनेक उत्तम कार सादर झाल्या आहेत. तसेच काही फ्यूचरिस्टिक वाहनं देखील पाहायला मिळाली आहे. मारुती सुझुकीने देखील आपली पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे.
भारतातील सर्वात मोठी प्रवासी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये त्यांच्या नवीन आणि आकर्षक कॉन्सेप्ट वाहनांचे प्रदर्शन केले आहे. ऑटो एक्स्पो 2025 मध्ये मारुती सुझुकी पॅव्हेलियनमध्ये स्विफ्ट ‘चॅम्पियन्स’ कॉन्सेप्ट, इन्व्हिक्टो ‘एक्झिक्युटिव्ह’ कॉन्सेप्ट, ब्रेझा ‘पॉवरप्ले’ कॉन्सेप्ट, जिमनी ‘कॉन्केरर’ कॉन्सेप्ट, ग्रँड विटारा ‘अॅडव्हेंचर’ कॉन्सेप्ट, फ्रॉनक्स ‘टर्बो’ कॉन्सेप्ट आणि द डिझायर अर्बन लक्स यांचा समावेश असेल. चला जाणून घेऊया, या कारमध्ये काय खास गोष्टी पाहायला मिळणार आहे.
आईशपथ एवढी जास्त किंमत ! Auto Expo 2025 मध्ये नवीन BMW X3 लाँच
आकर्षक डिझाइनसह स्विफ्ट ‘चॅम्पियन्स’ कॉन्सेप्ट सादर केली. या कारला एका ठळक लाल रंगात दाखवले आहे, त्याच्या रेसिंग-प्रेरित डेकल्समुळे कारच्या स्टाइल कोशेंटमध्ये भर पडते. वेग आणि उत्साहाच्या शोधात असलेल्यांसाठी ही सादर करण्यात आली आहे.
या कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये, ते अतिशय प्रीमियम इंटिरिअरसह सादर केले गेले होते. यात पूर्णपणे बेज रंगाचे इंटिरिअर आणि षटकोनी पॅटर्न अपहोल्स्ट्री आहे, जे खूप प्रीमियम दिसते. प्रीमियम कार शोधणाऱ्यांसाठी ही कॉन्सेप्ट कार आणण्यात आली आहे.
मारुती सुझुकी ब्रेझाची ‘पॉवरप्ले’ कॉन्सेप्ट ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. त्याची रचना खूपच स्टायलिश आहे. ही कार साईनिंग ऑरेंज रंगात दाखवले होते. या रंगात ही कार पूर्वीपेक्षा जास्त प्रीमियम दिसते.
याला म्हणतात दर्जा ! Tata Avinya चा स्टायलिश लूक पाहून Mahindra BE 6 आणि XEV 9e ला विसराल
जिमनीचे कॉन्सेप्ट मॉडेल कॉन्करर ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये सादर करण्यात आले. त्याला दिलेल्या डिझाइनमुळे ते सध्याच्यापेक्षा अधिक मजबूत आणि साहसासाठी सज्ज दिसते. याला डेझर्ट मॅट फिनिश देण्यात आले आहे, जे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर सहजपणे चालवू शकता.
२०२५ च्या ऑटो एक्स्पोमध्ये ग्रँड व्हिटारा ही लक्झरी एसयूव्ही म्हणून सादर करण्यात आली. ही कार सर्वात कठीण मार्ग देखील सहजतेने पार करू शकते. त्याच्या आर्मी ग्रीन रंगाच्या डिझाइनमुळे ते आणखी मजबूत आणि शक्तिशाली दिसते.
याव्यतिरिक्त FRONX ‘Turbo’ Concept आणि Dzire Urban Luxe Edition या दोन कॉन्सेप्ट कार सादर झाल्या आहेत.