फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही विभागात मोठ्या प्रमाणात कार ऑफर होत असतात. ग्राहक देखील कार खरेदी करताना जास्तकरून या सेगमेंटमधील वाहनांना जास्त प्राधान्य देत असतात. या सेगमेंटमध्ये अनेक कार लोकप्रिय झाल्या आहेत. Hyundai Venue ही त्यातीलच एक कार. नुकतेच या कारचे नवीन जनरेशन मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहे.
जर तुम्ही ‘या’ एसयूव्हीचे डिझेल व्हर्जन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आह. चला जाणून घेऊयात जर या कारसाठी तुम्ही 2 लाखांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला दरमहा किती ईएमआय द्यावा लागू शकतो.
New Hyundai Venue ची चावी खिशात घेऊन फिराल! फक्त दरमहा असेल ‘इतकाच’ EMI
ह्युंदाई कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये व्हेन्यूची नवीन जनरेशन सादर करण्यात आली आहे. याचे डिझेल व्हर्जन, HX2, 9.70 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. राजधानी दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत अंदाजे 11.03 लाख रुपये आहे. 9.70 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त यामध्ये आरटीओसाठी अंदाजे 85,000 आणि विम्यासाठी अंदाजे 48,000 रुपये समाविष्ट आहेत.
जर तुम्ही या कारचा डिझेल इंजिन असलेला बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँक एक्स-शोरूम किंमतीवरच तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देईल. दोन लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला उर्वरित रक्कम सुमारे 9.03 लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून घ्यावे लागतील. बँक जर सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजदराने 9.03 लाख रुपये मंजूर करत असेल, तर आपल्याला पुढील सात वर्षे दरमहा 14,532 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
Royal Enfiled ने सादर केली Himalayan Mana Black Edition, किंमत तर कारपेक्षाही महाग
9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 9.03 लाख रुपयांचे कार लोन घेतल्यास, सात वर्षे तुम्हाला दरमहा 14,532 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. या कालावधीत तुम्ही सुमारे 3.17 लाख रुपये व्याज म्हणून भराल. अशा प्रकारे एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याज मिळून Hyundai Venue साठी तुम्हाला एकूण खर्च अंदाजे 14.20 लाख रुपये येईल.
ह्युंदाई कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये व्हेन्यू ऑफर करते, जी Maruti Brezza, Tata Nexon, Mahindra XUV 3XO,Kia Sonet, आणि Kia Syros सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.






