फोटो सौजन्य: Gemini
Royal Enfield च्या बाईक्स फक्त भारतात नाही तर जगभरात नावाजल्या जातात. कंपनी नेहमीच ग्राहकांना उत्तम आणि हाय परफॉर्मन्स बाईक ऑफर करत असते. त्यातही तरुणांमध्ये तर कंपनीच्या बाईक्स विशेष लोकप्रिय असतात. याचे कारण म्हणजे त्यांचा दमदार लूक आणि विश्वासहर्ता ओळख.
रॉयल एनफील्डने पुन्हा एकदा ॲडव्हेंचर बाईकमध्ये आपला ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे. EICMA 2025 कार्यक्रमात, कंपनीने त्यांची नवीन बाईक, Royal Enfield Himalayan Mana Black Edition चे अनावरण केले. हे विशेष एडिशन भारतातील सर्वात उंच रास्ता, Mana Pass पासून प्रेरित आहे, जी समुद्रसपाटीपासून 5,632 मीटर उंचीवर आहे.
नवीन हिमालयन माना ब्लॅक एडिशनच्या डीप मॅट ब्लॅक पेंट फिनिशमुळे ती एक मजबूत आणि प्रीमियम लूक देते. ब्लॅक रॅली हँडगार्ड्स, ड्युअल सीट आणि रॅली मडगार्ड्समुळे बाईक ऑफ-रोड रायडिंगसाठी अधिक सक्षम बनते. वायर-स्पोक ट्यूबलेस व्हील्स सर्व भूप्रदेशांवर स्टॅबिलिटी प्रदान करते. रॉयल एनफील्डने या बाईकला फॅक्टरीमधूनच ॲडव्हेंचर-रेडी ॲक्सेसरीजसह लाँच केले आहे.
Mana Black Edition ही कंपनीच्या Sherpa 450 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे, ज्याच्यावर Himalayan 450 चे यश उभे राहिले. यात 451.65cc लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर DOHC इंजिन देण्यात आले आहे, जे 8,000 rpm वर 39.5 PS शक्ती आणि 5,500 rpm वर 40 Nm टॉर्क निर्माण करते. 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-अँड-असिस्ट क्लचमुळे राइडिंग अधिक स्मूद आणि नियंत्रित होते. रॉयल एनफिल्डनुसार, हे इंजिन खास हाय-एल्टिट्यूड आणि ऑफ-रोड परिस्थितीसाठी ट्यून केले असून दीर्घ ॲडव्हेंचर राइड्समध्ये उत्तम थ्रॉटल रिस्पॉन्स आणि हीट मॅनेजमेंट प्रदान करते.
2 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate साठी दरमहा किती EMI द्यावा लागणार?
Himalayan Mana Black Edition अशी रचना केलेली आहे की ती कोणत्याही प्रकारच्या भूभागावर आरामात चालू शकेल. बाईकचा ग्राउंड क्लीयरन्स 230 मिमी आहे आणि कर्ब वेट 195 किलो आहे. फ्रंटला 43 मिमी अपसाइड-डाउन फोर्क आणि रियरला लिंकेज-टाइप मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे, जे 200 मिमीपर्यंत ट्रॅव्हल उपलब्ध करून देते. या सेटअपमुळे बाईक कठीण आणि खडबडीत रस्त्यांवरही स्थिर आणि विश्वासार्ह राहते.
बाइकमध्ये 320 मिमी फ्रंट आणि 270 मिमी रियर डिस्क ब्रेक्स असून ड्युअल-चॅनल स्विचेबल ABS उपलब्ध आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने 4-इंच TFT डिस्प्ले, Google Maps-आधारित नेव्हिगेशन, राइड मोड्स (Eco आणि Performance), मीडिया कंट्रोल्स आणि USB Type-C चार्जिंग पोर्ट यांसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत.
रॉयल एनफील्ड हिमालयन माना ब्लॅक एडिशनची बुकिंग युरोपमध्ये आधीच सुरू झाली आहे. भारतात त्याची अंदाजे किंमत 7.4 से 7.6 लाख (एक्स-शोरूम) रुपयांदरम्यान असण्याची अपेक्षा आहे.






