दिवाळी संपली, पण ऑफर नाही!
दिवाळीत वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ होत असते. तसेच, जास्तीतजास्त ग्राहकांचा आकर्षित करण्यासाठी अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार डिस्काउंट देतात. यंदा देखील अनेक ऑटो कंपन्यांनी दिवाळीपर्यंत ऑफर्स ठेवल्या होत्या. मात्र काही इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्या अशा आहेत,जे दिवाळी नंतर सुद्धा ऑफर्स देत आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या ई बाईकवर अजूनही डिस्काउंट मिळत आहे.
ओबेन रॉर ईजी सिग्मा (ही भारतीय रस्त्यांसाठी डिझाइन केलेली एक प्रीमियम कम्यूटर ई-बाईक आहे, जी आराम, परफॉर्मन्स आणि स्मार्ट फीचर्सचा उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे. या बाईकची किंमत 3.4 kWh व्हेरिएंटसाठी 1.29 लाख आणि 4.4 kWh व्हेरिएंटसाठी 1.39 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे. ही बाईक 95 किमी./तास टॉप स्पीड मिळवू शकते आणि केवळ 3.3 सेकंदांत 0-40 किमी./तास स्पीड पकडते. रेंजच्या बाबतीत ही 175 किमी. (IDC) पर्यंत चालते. या बाईकसोबत 8 वर्षे / 80,000 किमी. बॅटरी वॉरंटी दिली जाते.
आजपासून VinFast VF6 आणि VF7 ची डिलिव्हरी सुरु, सिंगल चार्जवर मिळेल 510 किमीची रेंज
या सणासुदीच्या काळात कंपनीने ओबेन मेगा दिवाळी उत्सव (Oben Mega Diwali Utsav) सुरू केला आहे, ज्यात ग्राहकांना 35,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळतो. यात 20,000 रुपयांची थेट सवलत, 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक, गोल्ड कॉईन आणि iPhone जिंकण्याची संधी मिळते. ही ऑफर देशभरातील 50+ शोरूम्स, तसेच Amazon आणि Flipkart वर उपलब्ध आहे.
रिवॉल्ट RV400 ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कम्यूटर ई-बाइक्सपैकी एक आहे. याची किंमत ₹1.24 लाख ते ₹1.40 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. या बाईकमध्ये तीन राइडिंग मोड्स आहेत. ईको (40 किमी./तास, 150 किमी रेंज), नॉर्मल (65 किमी./तास, 100 किमी रेंज) आणि स्पोर्ट (85 किमी./तास, 80 किमी रेंज).
या दिवाळीत कंपनीने रिवॉल्ट दिवाळी डबल धमाका ऑफर (Revolt Diwali Double Dhamaka Offer) आणला आहे, ज्यात ग्राहकांना ₹1 लाख पर्यंतच्या फायद्यांचा लाभ मिळतो. यात ₹13,000 पर्यंत सवलत, ₹7,000 चे फ्री इन्शुरन्स, तसेच टीव्ही, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन यांसारख्या गिफ्ट्सचा समावेश आहे. याशिवाय एक भाग्यवान ग्राहकाला ₹1 लाखचे गोल्ड व्हाउचर जिंकण्याची संधी मिळेल.
नवीन 2026 Kawasaki Z650 S झाली सादर, मिळणार नवीन डिझाइन आणि फीचर्स
स्पोर्टी लुक आणि फ्यूचरिस्टिक फीचर्ससाठी ओळखली जाणारी ओला रोडस्टर X (Ola Roadster X) ही चार बॅटरी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यातील X+ मॉडेलमध्ये 11kW मोटर दिली असून, ती 125 किमी./तास टॉप स्पीडसह 501 किमी सर्टिफाइड रेंज प्रदान करते.
या दिवाळीत ओलाने ओला मुहूर्त महोत्सव ऑफर (Ola Muhurat Mahotsav Offer) जाहीर केले आहे, ज्यांत कंपनीच्या बाईक केवळ ₹49,999 च्या सुरवातीच्या किंमतीपासून उपलब्ध आहेत.






